‘तेव्हा माझ्याही हातून चूक घडली होती’; गडकरींनी सांगितला बांधकाम मंत्री असतानाचा किस्सा!

‘तेव्हा माझ्याही हातून चूक घडली होती’; गडकरींनी सांगितला बांधकाम मंत्री असतानाचा किस्सा!

Nitin Gadkari on Chandani Chowk : पुणे शहरातील चांदणी चौक येथील उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गडकरी यांनी राज्याचा बांधकाम मंत्री असताना एक चूक घडल्याचा किस्सा सांगितला.

गडकरी म्हणाले, चांदणी चौक प्रकल्पावर हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. पण या मर्गावर 1 लाख 55 हजार पॅसेंजर कार युनिट इतकी ट्राफिक आहे. माझे म्हणणे असते की माणसाने चूक केली तर ती स्वीकारली देखील पाहिजे. मी जेव्हा राज्यात बांधकाम मंत्री होतो. तेव्हा मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्ग बांधल्यानंतर पुण्यातील महापालिकेचे सात रस्ते मी बांधले होते. त्यावेळी हा वेस्टर्न बायपासही बांधला होता.

Nitin Gadkari : पुण्यात लवकरच धावणार स्कायबस! गडकरींनी सांगितला नवा प्रोजेक्ट

मात्र हा बायपास रस्ता तयार करत असताना पुढील 20 ते 25 वर्षांचा अंदाज घेणे गरजेचे होते. पण तो न केला गेल्यामुळे सर्व्हिस रोड देखील बरोबर नव्हते. उड्डाणपूल देखील नव्हते. त्यामुळे या रस्त्यावर समस्या निर्माण झाल्या. जसं आपलं हार्ट चोकअप झाल्यानंतर बायपास करतो तस कुणीतरी मला सांगितलं की सातारा रोडसाठी नवीन टनल बांधा म्हणजे प्रश्न सुटेल. मात्र तरीसुद्धा समस्या काही सुटली नाही, असे गडकरी म्हणाले.

गडकरी पुढे म्हणाले, मी मंत्री झाल्यानंतर अनेकदा पुण्यात आलो. पुणेकरांच्या तीन मागण्या होत्या. पुणे मेट्रोचे काम पूर्ण करावे. तसेच विमानतळाचा विकास करावा आणि चांदणी चौकातील पुलाचे काम करावे. या तीन मागण्यांतील दोन मागण्या पूर्ण झाल्या आहेत. मेट्रोचेही काम पूर्ण होत आहे. यासाठी मी पुणेकरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. उड्डाणपूल बांधण्यात अनेक अडचणी आल्या. एनडीएने तर 17 कोटी रुपये वसूल केले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यांनी पुलासाठी जमीन घेण्याचं काम कलं, असे गडकरी म्हणाले.

Devendra Fadanvis : पुणे विचारवंतांचे शहर, इथे निर्णय घेणे अवघड; पुणेकरांना फडणवीसांचे मिश्किल टोले

पेट्रोल-डिझेल हद्दपार करणार

पुण्याला पेट्रोल डिझेलपासून मुक्त केले तर चाळीस टक्के प्रदूषण कमी होईल. पुण्यातील कचऱ्याचा उपयोग रिंग रोड तयार करण्यासाठी वापरला तर पुण्यात कचरा उरणार नाही. मी पन्नास हजार कोटीत पुण्याचे सर्व उड्डाणपूल बांधून द्यायला तयार आहे. चांदणी चौकाचे नाव बदलण्याच्या चर्चा सुरू आहेत. आता दोन्ही दादांनी म्हणजेच चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांनी मिळवून ठरवावे. त्याला मी मान्यता देईल. देशातून पेट्रोल आणि डिझेल हद्दपार करणार असून यासाठी वेगवेगळे पर्याय अंमलात आणले जातील, असे गडकरी म्हणाले

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube