पवारांच्या घोषनेनंतर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यात एकांतात नेमकी चर्चा काय?

Discussion between Supriya Sule and Rohit Pawar in private after Pawar’s announcement : राज्याच्या राजकीय वर्तुळात शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांच्या निर्णयानंतर पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होतानाच इथून पुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असे शरद पवार यांनी जाहीर केले. लोक माझे सांगाती या शरद पवार यांच्या आत्मकथा पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या […]

Untitled Design   2023 05 02T204143.778

Untitled Design 2023 05 02T204143.778

Discussion between Supriya Sule and Rohit Pawar in private after Pawar’s announcement : राज्याच्या राजकीय वर्तुळात शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांच्या निर्णयानंतर पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होतानाच इथून पुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असे शरद पवार यांनी जाहीर केले. लोक माझे सांगाती या शरद पवार यांच्या आत्मकथा पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनचा कार्यक्रम मुंबईत झाला. त्यावेळी शरद पवार यांनी ही निवृत्तीची घोषणा केली. या घोषनेमुळं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. या यानंतर कार्यकर्ते, नेते अतिशय भावूक झाले. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावी, असा आग्रह कार्यकर्त्यांनी केली. दरम्यान, या पवारांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे एका झाडाखाली बसून चर्चा करत बसल्याचं पाहायला मिळालं.

गेल्या 60 वर्षांपासून देशाच्या राजकारणात शरद पवार नावाचं घोंघावणारं वादळ आता संसदीय राजकारणात दिसणार नाही. योग्य वेळी भाकरी फिरवावी लागते, ती नाही फिरवली तर ती करपते, असं सुचकपणे शरद पवार म्हणाले होते. पवारांच्या निर्णयानंतर अनेक कार्यकर्त्यांना रडू कोसळले होतं.

दरम्यान, या सगळ्या घडामोडींनंतर कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. या कार्यकर्त्यांना आवाहन करण्यासाठी सुळे या स्वत: वाय.बी.चव्हाण सेंटरच्या बाहेर आल्या. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे एकांतात एका झाडाखाली बसून चर्चा करत होते. पवारांनी एवढा मोठा निर्णय घेतल्यानंतर हे दोघे बराच वेळ चर्चा करत होते. या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं असेल… त्यांच्यात काय चर्चा सुरू असेल…? याविषयी तर्क-वितर्क लढवण्यात येत आहेत.

शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर राज्यभरात पडसाद, ‘कोणाचा राजीनामा तर कोणाची विनंती’

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त असल्याचं सांगत पुन्हा निवडणुकीला उभं राहणार नाही, अशी घोषणा केली. 1 मे 1660 ते 1 मे 2023 इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर कुठंतरी थांबायचा सुध्दा विचार केला पाहिजे. माणसाला अधिक मोह असू नये, आणि इतकी वर्ष संधी मिळाल्यानंतर आणखी मोह ठेवण्यासंबंधीची भूमिका मी काही कधी घेणार नाही. त्यामुळं तुम्हाला अस्वस्थता वाटेल, पण मी राष्ट्रवाजदी कॉग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचं सांगितलं. पवारांच्या निवृत्तीचा निर्णय हा राजकारण ढवळून काढणारा ठरला. पवारांनी निवृत्तीची घोषणा करण्यामागे काय खेळी असू शकते, याविषयी अंदाज बांधले जात आहेत.

पवारांच्या निर्णयामुळं जयंत पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड हे सर्वजण भावूक झाले. मुंडे यांनी पाया पडून पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली. सर्व कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर येऊन पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली. त्यामुळं आता पवार पुढची भूमिका काय घेतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.
—-

Exit mobile version