शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर राज्यभरात पडसाद, ‘कोणाचा राजीनामा तर कोणाची विनंती’

  • Written By: Published:
Untitled Design (14)

Sharad Pawar retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोक माझे सांगती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. पवारांच्या अचानक या घोषणेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये खळबळ उडाली. पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह दुसऱ्या फळीतील नेते, युवक कार्यकर्त्यांनी केली आहे. पवारांचा या निर्णयाने राज्याच्या राजकारणाबरोबर देशातील राजकारणामध्ये खळबळ उडाली.

बुलढाणा/धाराशिव जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच बुलढाण्यात सिंदखेडराजा येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने केली जात आहेत. बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष नाझेर काजी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Sharad Pawar : शरद पवारांचा काटेवाडी ते दिल्लीपर्यंतचा राजकीय प्रवास…

तसेच धाराशिवचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनीही आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. निवृत्तीच्या मागे घेण्याची मागणी करत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे.

नगरच्या जिल्हाध्यक्षांची विनंती
शरद पवार साहेबांनी पक्ष प्रमुख पदावरून दूर होण्याचा घेतलेला निर्णय आम्हाला कोणालाही मान्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष साहेबांच्या नावावर चालतो. निश्चित कामाचा वाढता व्याप इतरांकडे सोपवावा. टप्याटप्याटप्याने उत्तराधिकारी नेमावा. कारण लोकभावना साहेबांना कळतात. तह-हयात त्यांनीच पक्ष प्रमुखपदी राहावे अशी सर्वसामान्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची जनभावना आहे. घेतलेला निर्णय त्यांनी मागे घ्यावा अशी विनंती, अशी प्रतिक्रिया अहमदनगर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली आहे.

Tags

follow us