Download App

दिशा सालियन प्रकरणात उद्धव ठाकरे आरोपी..मुख्यमंत्री पदाचा गैरवापर, दिशाच्या वडिलांचा खळबळजनक आरोप

Disha Salian Father Allegations Uddhav Thackeray Accused : दिशा सालियन हत्या प्रकरणात (Disha Salian) ठाकरे कुटुंबाचं नाव सातत्याने घेतलं जातंय. आज दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी मुलीच्या हत्येची सखोल चौकशी करा, अशी मागणी केलीय. तर त्यांनी या प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या भूमिकेची चौकशी करत, अशी देखील मागणी केलीय. तर उद्धव ठाकरे यांना (Uddhav Thackeray) या प्रकरणात सहआरोपी केलंय.

आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना पदाचा गैरवापर केला, असा आरोप दिशाच्या वडिलांनी केलाय. तर ड्रग्जच्या व्यापारामध्ये आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा खळबळजनक दावा देखील त्यांनी (Disha Salian Case) केलाय. त्यामुळे आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट येताना दिसत आहे.

8 जून 2020 रोजी दिशा सालियनचा संशयास्पद मृत्यू झाला होता. ही आत्महत्या होती की हत्या, यावरून खूप राजकारण रंगलं. तर दिशाच्या वडिलांनी याप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केलीय. दिशाची सामूहिक अत्याचारानंतर हत्या (Maharashtra Politics) करण्यात आली, असा आरोप त्यांनी केलाय. आज तशी लेखी तक्रार त्यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांना सहआरोपी करण्याची मागणी त्यांनी केलीय.

‘…तर आम्ही तिथे येवून सगळी’, एफआरपीवरून राजू शेट्टी आक्रमक, सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेटम

दिशा सालियनचा 8 जून 2020 रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. पण ही आत्महत्या होती की हत्या? यावरून बरेच राजकारण रंगले आहे. पण आता दिशाचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात याचिका दाखल करून आपल्या मुलीची सामूहिक अत्याचारानंतर हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी मंगळवारी मुंबईच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांशी बोलताना त्यांच्या वकिलांनी या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनाही सहआरोपी करण्यात आल्याचे

सतीश सालियन यांचे वकील नीलेश ओझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सुरज पंचोली, रमबीर सिंह, सचिन वाझे, रिया चक्रवर्ती यांचा आहे. हे प्रकरण दाबण्यातील मुख्य मास्टरमाईंड परमबीर सिंह आहे. तर आदित्य ठाकरे यांचे नाव प्रकरणात आल्यानंतर कव्हरअप करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यांनी आतापर्यंतच्या सर्वच गोष्टी खोट्या असल्याचा दावा केलाय.

मोठी बातमी! छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी

आदित्य ठाकरे यांचा ड्रग्जच्या व्यापारामध्ये सहभाग असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. त्याची माहिती दिली असल्याचं देखील दिशा सालियनच्या वकिलांनी म्हटलंय. आदित्य ठाकरे आणि डिनो मोरिया यांच्या फोन रेकॉर्डिंगचा देखील यात समावेश आहेत. या सर्वांचा नार्कोटिक्स ब्युरोने ड्रग्ज प्रकरणामध्ये आरोपी बनवलेल्या समीर खानशी संबंध आहे. यावर सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केलीय.

 

follow us