Uddhav Thackeray : सर्वोच्च न्यायालयाने लवाद म्हणून अध्यक्षांकडे हा निकाल दिला होता. त्यांना सांगितलं होतं की पात्र अपात्र ठरवा. ते त्यांनी ठरवलं नाही. आता शिंदे हायकोर्टात गेलेत की ठाकरे गटाला अपात्र का ठरवलं नाही? त्यांनी देखील एकप्रकारे नाराजी व्यक्त केली आहे. मग त्यांना दुसरं आव्हान देतो की तुम्हालाही न्याय मिळाला नाही आणि आम्हालाही नाही. तुम्ही नेमलेला अध्यक्ष आहे. राज्यपालांना मी विनंती करतो जसं त्यावेळी राज्यपालांनी अधिवेशन बोलवलं होतं तसं पुन्हा बोलवा. अध्यक्षांविरोधात अविश्वास आणा, जाहीर पाठिंबा देतो हाकला ह्यांना, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर (RAHUL NARVEKAR) केला आहे.
गेल्या आठवड्यात लबाडाने जो निकाल दिला… नाही लावादाने. लबाडाने नाही लवादाने जो निकाल दिला, त्या निकालाविरोधात आपण सुप्रीम कोर्टात गेलो आहोत. सुप्रीम कोर्टाकडून शेवटची आशा आहे. शेवटची आशा मानलं तरी लोकशाहीतील सर्वोच्च घटक इथली जनता आहे. देशातील मतदार सरकार ठरवतं असतं. जगामध्ये खूप कमी देश आहेत ज्यांनी संविधान जनतेच्या चरणी अर्पण केलं आहे. म्हणजे सरकार कोणाचेही असलं तरी सत्ता जनतेची असली पाहिजे. निकालबद्दल बरंच काही सांगिलेल आहे. हा सुर्य, हा जयद्रत. आतातरी निकाल मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
घटनादुरुस्ती नाकारली पण ‘त्या’ ठरावाला नार्वेकरांचीच हजेरी; ठाकरे गटाने पुराव्यात व्हिडिओच दाखवला
संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे पुरावा, पुरावा की गाडावा? माझं तर आव्हान आहे की नार्वेकरांनी अन् शिंदेंनी माझ्यासोबत जनतेत उभा राहावं. पोलीस संरक्षण नाही. मी एक देखील पोलीस संरक्षण घेणार नाही. शिंदेंनी यावं, नार्वेकरांनी यावं. तिथं नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कोणाची? मग जनतेने ठरवावं कोणाला गाडावा, कोणाला पुरावा. माझ्यात हिंमत आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
कल्याण : श्रीकांत शिंदे पडणार? ‘वाघिणीला’ मैदानात उतरवत ठाकरे मोठा डाव खेळण्याच्या तयारीत!
जर का तुम्ही शिवसेना त्यांना विकली असेल तर ती म्हणजे विकाऊ वस्तू नाही. एवढं तुम्ही केल्यानंतरही मी जिथं जिथं जातो तिथं लाखो जनता, शिवसैनिक माझ्यासोबत कसे? आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो तर शिंदे गट उच्च न्यायालयात गेला. म्हणजे तिकडं पण टाईमपास करायचा आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.