सोलापूर : ‘जितेंद्र आव्हाड हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू देवदेवता यांच्याविषयी आकेपार्ह विधान करत आहेत. कदाचित जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून शरद पवार बोलत आहेत. आव्हांडांना हे माहित नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर जितेंद्र आव्हाड हे जित्तूडीन, अजित पवार हे अझरोद्दीन, शरद पवार हे शामशोद्दीन आणि रोहित पवार हे रझाक झालें असते.’ अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
त्याचबरोबर यावेळी मतांसाठी घाणेरड राजकारण करणं ही पवारांची 50 वर्षांतील कूटनिती आहे. असा घणाघात देखील यावेळी पडळकरांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केला आहे. ते सोलापूरमध्ये असाताना त्यांनी हे विधान केलं आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सोलापूरमध्ये आहेत. सोलापूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसराची पाहाणी करण्यासाठी आलो आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. तर सोलापूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा. अशी मागणी होत आहे.
पूर्णकृती पुतळ्यासाठी प्रयत्न करू. अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
त्याचबरोबर दुर्दैवाने कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुका लागत आहेत. या निवडणुका बिनविरोध झाल्या नाहीत. तर दोन्ही निवडणुका भाजप लढेल आणि जिंकेल. असा विश्वास देखील यावेळी गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे.