Download App

Narayan Rane : आदित्य ठाकरेंचं नाव घेऊ नका, माझा दिवस खराब जाईल…

  • Written By: Last Updated:

पुणे : पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आदित्य ठाकरेंबद्दल प्रश्न विचारला असता ‘आदित्य ठाकरेंचं नाव घेऊ नका माझा दिवस खराब जाईल, मला उपवास करावा लागेल.’ अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली ते पुण्यात एका कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते. त्यावेळी ही पत्रकार परिषद पार पडली.

त्याचबरोबर कोकणातील पत्रकार शशिकांत वारीसे यांचा एका अपघातात मृत्यू झाला. या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर आरोप केला आहे. यावर प्रश्न विचारला असता राणे पत्रकारांवरच संतापले. म्हणाले, मी पत्रकार शशिकांत वारीसे यांना कधीही भेटलेलो नाही. यात माझा काही संबंध नाही असे राणे यावेळी म्हणाले.

पोलिसांचा वेश, आत्मदहनाचा प्रयत्न…रविकांत तुपकरांनी काय केलं?

एका कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते. यावेळी मंत्री नारायण राणे यांना पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूप्रकरणावर विचारण्यात आले. दरम्यान तत्पूर्वी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी या प्रकरणात राणे यांच्यावर संशय व्यक्त केला. यालाच प्रत्युत्तर देताना राणे म्हणाले, पत्रकार वारीशे याला मी कधीही भेटलो नाही, माझा काही संबंध नाही. तसेच सिंधुदुर्गात काही झाले तरी त्या विनायक राऊत यांच्या तोंडावर केवळ एकच नाव असते. विनायक राऊत म्हणजे आमच्या सिंधुदुर्गला लागली कीड आहे, अशा शब्दात नारायण राणे यांनी राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच राणे म्हणाले,

कोकणातील पत्रकार शशिकांत वारीसे यांचा 6 फेब्रुवारीला अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर वारीशे यांना कोल्हापूरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता, 7 फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक पंढरीनाथ आंबेरकरला अटक करण्यात आली आहे. पण, हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर गंभीर आरोप केला आहे.

Tags

follow us