Download App

नागालँडचे उदाहरण देऊन दिशाभूल करु नका, शरद पवारांनी सुनावले

Sharad Pawar criticizes Ajit Pawar : आम्ही भाजपसोबत गेलो तर चुकलं काय? तुम्ही नागालँडमध्ये परवानगी दिली आम्हाला आशिर्वाद द्या, असे त्यांच्याकडून बोलले जाते. खरं आहे नागालँडमध्ये राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. पण चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील राज्याबाबत अतिशय विचार करुन निर्णय घ्यावे लागतात. बाहेरच्या देशांनी काही गैरफायदा घेऊ नये. सरकार स्थिर राहावे म्हणून आपण बाहेरून पाठिंबा दिला. पण महाराष्ट्रात तुम्ही सरकारमध्ये जाऊन बसलात. त्यामुळे नागालँड उदाहरण महाराष्ट्रसाठी लागू होत नाही. लोकांची दिशाभूल करु नका, असे शरद पवार यांनी अजित पवार गटाला सुनावले.

आज आपले काही सहकारी बाजूला गेलेत म्हणून आपण अस्वस्थ होतो. पण आठ दिवसांपूर्वी तेच भाषणात सांगते होते की असला मुख्यमंत्री झाला नाही. आता असल्या मुख्यमंत्र्यांच्याबरोबर दंडवत घालून काम करणार आहेत, अशी टीका शरद पवार यांनी केली. काही लोकांनी बाजूला जाण्याची भूमिका घेतली त्याबद्दल माझी काही तक्रार नाही पण दु:ख आहे. कारण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यांना विधीमंडळात आणण्यासाठी कष्ट घेतले. त्यांच्या मेहनतीमुळे विधीमंडळात जाण्याची संधी मिळाली. ज्या कार्यकर्त्यांनी कष्ट करुन हे दिवस आणले त्यांना विश्वासात न घेता, पक्षाला विश्वासात न घेता वेगळी भूमिका घेतली. त्यांची फसवणूक केली, अशी टीका शरद पवार यांनी केली.

जयंत पाटीलही आक्रमक मोडमध्ये, काढली अजितदादांची लाज

मधल्या काळात आपल्या राज्यात दंगली झाल्या. या दंगलीमध्ये कोण होते हे साऱ्या देशाला माहिती आहे. जाणीवपूर्वक असं वातावरण तयार केलं जातंय. जिथं आपली सत्ता नाही अशा ठिकाणी द्वेष वाढवायचा आणि त्याचा राजकीय फायदा घ्यायचा असा प्रयत्न आहे. जातीय आणि धर्मामध्ये अंतर वाढवणारे राष्ट्रप्रेमी असू शकत नाही. जे राष्ट्रप्रेमी नाहीत त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका आम्ही घेणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

ते पुढं म्हणाले की आता सांगतात की शरद पवारांनी पुलोद सरकार बनवलं होतं. हो बनवलं होतं, आणीबाणीच्यानंतर सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला होता. त्यावेळी सर्वांनी मिळून सांगितले तुम्ही याचे नेतृत्व करा. त्यावेळी भाजप नव्हता. जयप्रकाश नारायण यांच्या विचारातून जनता पक्ष तयार केला होता, असे शरद पवार यांनी सांगितले.

दोन्ही गटांचा राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा; ठोठावलं निवडणूक आयोगाचं दार

आज असं सांगितले जात आहे की तुम्ही शिवसेनेसोबत गेला म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो. इंदिरा गांधींच्या काळात शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला. शिवसेनेचं हिंदुत्व ते लपून ठेवत नाहीत. पण ते हिंदुत्व आठरापगड जातींना सोबत घेऊन जाणारे आहे. भाजपचे हिंदुत्व विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक आहे. माणसामाणसामध्ये अंतर वाढवणारे, द्वेष वाढवणारे आहे. हे हिंदुत्व भाजपच्या वतीने पेरलं जातंय, असे शरद पवार यांनी सांगितले.

Tags

follow us