Download App

संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या, स्वप्ना पाटकरांकडून छळाचा गंभीर आरोप; थेट अमित शाहांकडे तक्रार

संजय राऊत यांनी माझ्यावर गुप्तहेर सोडून पाळत ठेवली होती, असा गंभीर आरोप स्वप्ना पाटकर ( Swapna Patkars) यांनी केला आहे.

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Dr Swapna Patkars serious allegations against Sanjay Raut: उद्धव गटाचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे एका जुन्या प्रकरणात पुन्हा अडचणीत आले आहे. डॉ. स्वप्ना पाटकर (Swapna Patkar) यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांची भेट घेतली आहे. संजय राऊत यांनी माझा आणि कुटुंबीयांचा छळ केला असल्याचा गंभीर आरोप पाटकर यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी माझा आणि कुटुंबीयांचा छळ केला आहे. संजय राऊत यांनी माझ्यावर गुप्तहेर सोडून पाळत ठेवली होती, असा गंभीर आरोप स्वप्ना पाटकर यांनी केला आहे. गुप्तहेर व्यंकटेश अप्पर याला वाकोला पोलिसांच्या ताब्यातही देण्यात आले होते. मात्र तो फरार झाला आहे. मला दुबई आणि पाकिस्तानमधून धमकीचे फोन येत आहेत. तसेच घरावर बाटल्या फेकल्याचा आरोपही स्वप्ना पाटकर यांनी केला आहे. याप्रकरणी पाटकर यांनी गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल यांच्याकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी राऊतांवर कायदेशीर कारवाई करून न्याय देण्याची, मागणी स्वप्ना पाटकर यांनी केले आहे. तर या प्रकरण निलम गोऱ्हे यांनीही एक मोठे वक्तव्य केले आहे. संजय राऊतांवर कारवाई करावी, यासाठी मी या प्रकरणात पडले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यावर कारवाई करतील, असे गोऱ्हे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.


शिर्डीतील विखेंची जहागीरदारी संपत नाही, तोपर्यंत विकास होणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल


पाटकरांना संरक्षण देऊन, विशेष पथकाकडून चौकशी करा

स्वप्ना पाटकर यांना अधिक संरक्षण पुरवून त्यांनी दाखल केलेल्या विविध गुन्ह्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत विशेष पथक नेमून तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. संजय राऊत यांच्याकडून त्यांचा छळ होत आहे. जीविताला धोका आहे, असे निवेदन शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांना पाटकर यांनी दिले आहे. या प्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात गुन्हात दाखल आहे.

Disha Patani: दिशा पटानी हिच्या दिलखेच लूकवर चाहत्यांच्या नजरा, फोटो तुफान व्हायरल

वाकोला पोलीस ठाण्यात गुप्तहेरामार्फत पाठलाग केल्याचा गुन्हा दाखल आहे. दहा वर्षांपूर्वीच हे गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे प्रलंबित आहे. राऊत यांनी 2022 मध्ये स्वप्ना पाटकर यांना शिविगाळ व धमकी दिल्याचा गुन्हाही दाखल आहे. मनोर पोलीस ठाण्यातील 2019 मधील गुन्हा प्रलंबित आहे. तत्कालीन मनोर पोलीस निरीक्षक व पोलीस अधीक्षक यांनी त्रास दिल्याचे पाटकर यांचा आरोप असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.पाटकर यांचे समुपदेशनाचे काम बंद पाडण्यात आले आहे. चित्रपट प्रकल्प थांबविण्यात आला आहे, असे देखील डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

follow us

वेब स्टोरीज