‘राऊत बळीचा बकरा’, ‘मी बकरा नाही वाघ’; नीलम गोऱ्हेंना राऊतांनी पद्धतशीर सांगितलं

‘राऊत बळीचा बकरा’, ‘मी बकरा नाही वाघ’; नीलम गोऱ्हेंना राऊतांनी पद्धतशीर सांगितलं

Sanjay Raut Vs Neelam Gorhe : शिवसेनेच्या सत्तासंघर्षानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये नेहमीच शाब्दिक चकमक सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आता उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेंच्या गोटात गेलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) बळीचा बकरा म्हणत सडकून टीका केली. त्यावर संजय राऊतांनीही गोऱ्हेंना पद्धतशीर उत्तर दिलं आहे. मी बकरा नाही वाघ, पळपुट्यांनी बोलू नये, असं प्रत्युत्तर राऊत यांनी दिलं आहे.

ऐन थंडीत राजकारण तापलं! ‘महुआवर अन्याय अन् लोकशाहीची हत्याच’; ममता बॅनर्जी भडकल्या
काय म्हणाल्या होत्या नीलम गोऱ्हे?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत जेव्हा जेलमधून बाहेर आले होते, तेव्हा मी त्यांना सांगितलं की, तुम्ही काम करा पण कारण नसताना अतिआक्रमक बोलण्यापेक्षा वैचारिक भूमिका मांडा, त्यावर तुम्ही विचार करावा असं मी सांगितलं असल्याचं नीलम गोर्हे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यावर राऊत म्हणाले मी माझं आयुष्य समर्पित केलेलं आहे मी असंच बोलणार.. आपण त्यांना सांगण्याचं काम करु शकतो. पक्षश्रेष्ठींना त्यांचं बोलणं आवडणार होतं, त्यामुळे संजय राऊतांना बळीचा बकरा केलं असल्याचं गोऱ्हेंनी म्हटलं होतं.

‘अ‍ॅनिमल’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! पहिल्या आठवड्यात जमवला 536.3 कोटींचा गल्ला

संजय राऊत म्हणाले :
मी बकरा, शेळी नाही तुमच्यासारखा, वाघ आहे. तुमच्यासारख्या पळपुट्यांनी बोलू नये. मी माझ्या पक्षाशी ईमानदारीने काम करणार आहे. माझं आयुष्य बाळासाहेबांसोबत काम करण्यात गेलं आहे. जे आत्ता बोलतात त्या कधी आल्या पक्षात.. पक्षात आल्यानंतर त्यांनी खा…खा..खाल्ल आणि ताट घेऊन निघून गेल्या. ताट, वाटी, चमचेही घेऊन गेले, त्यांनी आमच्यावर बोलू नये. मला बकरा करायचं की शेळी हे ठरवणारे तुम्ही कोण? असा सवाल उपस्थित करीत बाळासाहेबांनी आम्हाला वाघ बनवलं असल्याचं संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं आहे.

दरम्यान, शिवसेना फुटी पूर्वीच्या पक्षातील वातावरणावरही गोऱ्हे यांनी भाष्य केलं. मला एक्सेस होता. मात्र, प्रश्न घेऊन जाणाऱ्या अनेक बड्या नेत्यांना न्याय मिळत नव्हता. नेत्यांना काम करू देत नव्हते. अपमान केला जायचा. त्यांना जाणीवपूर्वक बाजूला करण्यात यायचे. मनोहर जोशी यांच्याबाबतीतही हेच घडलं. त्या म्हणल्या, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल चांगल्या भावना आहेत. मात्र बड्या नेत्यांपेक्षा त्यांनाच जास्त निमंत्रण मिळत होते. जनाधार असलेल्या नेत्यांना डावललं जात असल्याचं खटकायचं, असं गोऱ्हे म्हणाल्या होत्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube