संजय राऊतांना पक्षाने बळीचा बकरा केलं; नीलम गोऱ्हेंचं भुवया उंचावणार वक्तव्य

  • Written By: Published:
संजय राऊतांना पक्षाने बळीचा बकरा केलं; नीलम गोऱ्हेंचं भुवया उंचावणार वक्तव्य

Neelam Gorhe : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू झाले आहे. विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे नेते दावे-प्रतिदावे करत आहेत. त्यातच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी ठाकरे गटावर आणि खासदार संजय राऊतांवर टीकास्त्र डागलं. पक्षाने संजय राऊत (Sanjay Raut) यांना बळीचा बकरा बनवल्याचे रोखठोक विधान गोऱ्हे यांनी व्यक्त केले. त्या नागपूर प्रेस क्लबतर्फे आयोजित मीट द प्रेस कार्यक्रमात बोलत होत्या.

इथेनॉल निर्मितीवरील बंदीमुळे राजू शेट्टी आक्रमक; शेलक्या शब्दात सरकावर बरसले 

यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, प्रत्येक राजकीय नेत्याची शैली वेगळी असते. शिवसेनेना प्रमुखांची स्टाईल वेगळी होती. त्यावेळी कडक शिस्त होती. त्यांच्याकडे बारीक-सारिक गोष्टींचाही सविस्तर माहिती असायची. 2015 नंतर कार्यपध्दती बदलली. शिवसेना आक्रमक होती. मात्र, नंतर आक्रमकपणा कमी झाला…. आज संजय राऊत जे काही बोलतात, तेच बोलतात जे त्यांना सांगितले जाते. पक्षाला आक्रमक माणूस पाहिजे, म्हणून संजय राऊत आक्रमक बोलतात.त्यांच्याबद्दल आदर असला तरी त्यांची शब्दप्रणाली पटत नव्हती. त्यामुळे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आपण त्यांना समजावलं देखील. आक्रमक बोलण्यापेक्षा वैचारिक मतभेद वेगळ्या पध्दतीने मांडा, असंही सांगितलं. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झालं. नंतर राऊत यांचा बळीचा बकरा बनवल्याचं लक्षात आलं, असं गोऱ्हे यांनी सांगितलं.

‘शिकला होता तर तुरुंगात कशाला गेला, माझं शिक्षण..,’; जरांगेंची पुन्हा जळजळीत टीका

शिवसेना फुटी पूर्वीच्या पक्षातील वातावरणावरही गोऱ्हे यांनी भाष्य केलं. मला एक्सेस होता. मात्र, प्रश्न घेऊन जाणाऱ्या अनेक बड्या नेत्यांना न्याय मिळत नव्हता. नेत्यांना काम करू देत नव्हते. अपमान केला जायचा. त्यांना जाणीवपूर्वक बाजूला करण्यात यायचे. मनोहर जोशी यांच्याबाबतीतही हेच घडलं. त्या म्हणल्या, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल चांगल्या भावना आहेत. मात्र बड्या नेत्यांपेक्षा त्यांनाच जास्त निमंत्रण मिळत होते. जनाधार असलेल्या नेत्यांना डावललं जात असल्याचं खटकायचं, असं गोऱ्हे म्हणाल्या.

एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची कल्पना होती का, असं विचारलं असता त्या म्हणाल्या की, कोविडमध्ये शिंदे यांच्याकडे मोठी जबाबदारी होती. मात्र, त्यांना कामच करू दिले जात नव्हते. उद्धव ठाकरे आजारी पडल्यानंतर संपर्क तुटला. पारदर्शकताही दिसून येत नव्हती. पक्षात आपल्याला डावलले जात असल्याची अनेकांची भावना झाली. एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. यामुळे ते नाराज असल्याची कल्पना होती, असं गोऱ्हे म्हणाल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube