Disha Patani: दिशा पटानी हिच्या दिलखेच लूकवर चाहत्यांच्या नजरा, फोटो तुफान व्हायरल

Disha Patani

दिशा पटानीने हिरव्या रंगाच्या साडीत केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे. दिशा पटानीचा हिरव्या साडीतला काळजावर वार करणारा कातील लूक कसा वाटला?

दिशा पटानी तिच्या जादूई वावरामुळे बॉक्स ऑफिसवर विजेती म्हणून उदयास आली आहे. तिने स्वतःला 'स्क्रीन क्वीन' Screen Queen म्हणून सिद्ध केले आहे.

टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड यापेक्षाही एक यशस्वी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीची ओळख आहे. लोफर या तेलुगू चित्रपटांतून अभिनयाला सुरुवात केल्यानंतर निवडक पण सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली.

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेते. चित्रपटांव्यतिरिक्त दिशा तिच्या ग्लॅमरस लूकमुळेही चर्चेत असते.
