ed taken action against mla rohit pawar sugar factory, rohit pawar reaction: आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या संबंधित साखर कारखान्यावर आता ईडीने कारवाई केली आहे. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड साखर कारखाना (Kannad Sugar Factory) ईडीने जप्त केला आहे. 161 एकर जागा, कारखान्याची मशिनरी ईडीने जप्त केला आहे. हा कारखाना राज्य सहकारी बँकेने बेकायदेशीरपणे बारामती अॅग्रो कंपनीला विकल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) (शरद पवार) गटाने भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत या कारवाईबाबत प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या कंपनीवर ईडीने केलेल्या कारवाईचे ट्विट वाचले आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का? असा खोचक टोलाही पवारांनी लगावला आहे.
सर्वात मोठी बातमी : कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त, रोहित पवारांना धक्का
रोहित पवारांनी आपल्या ट्वीटमध्ये अजित पवार गटावरही निशाणा साधला आहे. पण भाजपाने लक्षात ठेवावे. झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू. माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत, या कारवाईवरुन निवडणुकीची आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतेय, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
आदित्य-तेजस त्यांना काका म्हणायचे, घरातलाच माणूस फिरला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
हr कारवाई पूर्णतः बेकायदा आहे. याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.
माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का?😂
पण भाजपाने लक्षात ठेवावं…. झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू!
माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न…— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 8, 2024
महादेव तिसरा डोळा उघडले तेव्हा अनेकांचा थयथयाट
वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीने कारवाई केली. आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई. परंतु मी महादेवाचा भक्त आहे… अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेव्हा अनेकांचा थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.