Download App

फोडाफोडीमुळे जागा कमी, विधानसभेपूर्वी महायुतीला आत्मचिंतनाची गरज; खडसेंचा सल्ला

अनेक संस्थांनी एक्झिट पोल जाहीर केले lत्यावर Eknath Khadase यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी यावेळी महायुतीला एक सल्ला देखील दिला आहे.

Eknath Khadase advise to Mahayuti after Exit poll : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यात मतदान (Lok Sabha Election Exit Poll 2024) झाल्यानंतर अनेक संस्थांनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत. त्यात राज्यात महायुतीच्या जागा कमी झाल्याचे चित्र समोर आले आहे. त्यावर भाजप प्रवेशाची वाट पाहत असलेले नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadase ) यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी यावेळी महायुतीला एक सल्ला देखील दिला आहे.

विधानसभेपूर्वी महायुतीला आत्मचिंतनाची गरज…

खडसे म्हणाले की, एक्झिट पोलमध्ये एनडीएला साडेतीनशे पेक्षा जास्त जागा येतील. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राज्यामध्ये महाविकास आघाडीला एक दोन जागा जास्त येतील असे चित्र दिसत आहे. तर एक्झिट पोलमध्ये एनडीएला साडेतीनशेच्या पुढे जागा येतील असं सांगितलं. मात्र मला तसं वाटल नव्हतं. तीनशे ते सव्वातीनशेच्या आसपास जागांचा माझा अंदाज होता. तर फोडाफोडीच्या राजकारणामुळे राज्यात महायुतीच्या जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचा सल्ला खडसे यांनी दिला.

महाराष्ट्रात काटे फिरले पण, अरुणाचलात अजितदादांचा जलवा; राष्ट्रवादीच्या शिलेदारांची आघाडी

तर रावेर मध्ये रक्षा खडसे या विजय होतील याचा विश्वास पूर्वीपासूनच आहे मात्र आता एक्झिट पोल नुसार त्या लाखभराच्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास मला आहे. तसेच यावेळी खडसे यांनी आपल्या भाजप प्रवेशावर देखील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले माझ्या भाजप प्रवेशाची प्रतीक्षा गेले कित्येक दिवसांपासून आहे. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर ही प्रतीक्षा संपणार आहे. लवकरच माझा पक्ष प्रवेश पार पडेल असं मला वाटतं. असं यावेळी खडसे म्हणाले आहेत.

पुणे अपघात प्रकरण ताजं असतानाच मद्यधुंद ‘CEO’चा प्रताप; दोन गाड्यांना उडवून ठोकली होती धूम

एक्झिट पोलने महाराष्ट्र कुणाला साथ देणार याचा अंदाज बांधला आहे. काही एक्झिट पोल्सने महाविकास आघाडी तर काही पोलमध्ये महायुती विजयाचा गुलाल उधळणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, टुडेज चाणक्य, न्यूज 18 पोल हब, एनडीटीव्ही जन की बात आणि रिपब्लिक भारत मेट्रीजने महायुतीला चांगलं यश मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. तर टीव्ही 9 पोलस्टारने महाविकास आघाडी विजयी होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

follow us

वेब स्टोरीज