Eknath Khadse : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) हे पहिल्या दिवसापासून मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड ( Walmik Karad ) यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. त्यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, असं म्हटलं. त्यावर आता एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) भाष्य केलं.
Video: मोठी बातमी! प्रशांत किशोरला बिनशर्त जामीन मंजूर, तुरुंगातून सुटका
गरज सरो, वैद्य मरो हे सरकारचं धोरण
एकनाथ खडसेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना बीड हत्या प्रकरणावर बोलतांना ते म्हणाले की, या हत्या प्रकरणात सतत काही ना काही आरोप होत आहे. सुरेश धसांवरही आरोप होत आहेत आणि वाल्मिक कराड यांच्यावरही आरोप झाले. त्यामुळं सुरेश धस आणि वाल्मिक कराड दोघांचीही चौकशी झाली पाहिजे, असं म्हणत या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असं खडसे म्हणाले.
महायुतीत समन्वय नाही
मी काय तुमचा सालगडी आहे का? या अजित पवारांच्या वक्तव्यावरी खडसेंनी भाष्य केलं. अजितदादा संभ्रमावस्थेत आहेत. त्यांचं विधान अस्वस्थतेतून आलं. शिवाय, गरज सरो अन् वैद्य मरो, असं सरकारचं धोरण आहे अशी टीकाही खडसेंनी केली. निवडणुकीचे निकाल लागून एक महिना झाला. स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर अद्याप पालकमंत्रीही ठरत नाही. याचा अर्थ महायुतीत समन्वय नाही.
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते आपला मानसिक छळ करत आहेत. आतापर्यंत मला 800 कॉल्स आले, असा आरोप दमानियांनी केलं. याविषयी विचारलं असता खडसे म्हणाले की, दमानियांना 800 आले आहेत, असं त्या म्हणतात. या कॉल्सचे डिटेल्स त्यांनी मुख्यमंत्र्यांना देऊन चौकशीची मागणी करावी.
लाडकी बहिण योजनेतील पात्र महिलांच्या अर्जांची छानणी करून निकषबाह्य अर्ज अपात्र ठरवले जाणार असल्याची चर्चा आहे. यावरून त्यांनी महायुतीवर टीका केली. निवडणुकीच्या आधी हेच सरकार योजना बंद होणार नाही, अस सांगत असे. आता सरकार येऊन एक महिना झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी होतेय. हे कशासाठी? पैसे दिले तर परत किमान परत तरी घेऊ नका. योजना बंद करू नका. जो शब्द दिला, तो पाळा.