Download App

Sushma Andhare : एकनाथ शिंदे फक्त कळसुत्री बाहुली, फडणवीस खरे सूत्रधार

  • Written By: Last Updated:

अमरावती : उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून सध्या शिवगर्जना सप्ताह सुरू आहे. याअंतर्गत गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. काल सुषमा अंधारे यांची आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्या बडेनरा मतदारसंघात सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे फक्त कळसुत्री बाहुली, फडणवीस खरे सूत्रधार असल्याची टीका त्यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे निर्णायक पदावर नाहीत. ते देवेंद्र फडणवीस यांच्या रिमोटचा बाहुला आहेत. त्यांनी रिमोट चालू केला की ते बोलतात, बंद केला की ते थांबतात. देवेंद्र फडणवीस कळसुत्री बाहुल्यांचे सुत्रधार आहेत, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष्य केलं.

खोके सत्तेत आल्यापासून बदल्याचं सत्र सुरू झालं. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, शिक्षकांच्या बदल्या, शिक्षण अधिकाऱ्यांच्या बदल्या, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचं प्रमाण वाढलं आहे. आणि बदल्यांसाठी वाटेल तेवढे पैसे घेतले जातात. खोके घेऊन कोठे समाधान होतं, म्हणून बदल्यांसाठी पैसे घेतच राहतात, अशी टीकाही त्यांनी केली.

Shinde VS Thackeray : उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी मराठी मुस्लिम सेवा संघाचं पत्रक, केलं ‘हे’ आवाहन

यावेळी त्यांनी खासदार नवनीत राणा यांचाही समाचार घेतला आहे. अधारे म्हणाल्या, जर नवनीत राणा यांना वाटत असेल. त्या फार हुशार फक्त आहेत. सुंदर अॅक्टर आहेत. तर नवनीत राणा यांनी गैरसमज काढून टाकावे. नवनीत अक्का तुम्ही कधी चांगल्या अभिनेत्री नव्हत्या. तिकडे तुमचं बॉक्स ऑफिसवर काहीच चाललं नाही, म्हणून तुम्ही बोगस जात प्रामाणपत्र बनवून इकडे आल्या. नाही तर तुम्ही बिनकामाची स्टंटबाजी व नौटंकी केली नसती, असा टोला सुषमा अंधारे यांनी नवनीत राणा लगावला.

दरम्यान, शिवाजी महाराज यांच्या पुतळा बसविण्यासाठी राडा केला पण भगतशिंग कोशारी यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला तेव्हा नवनीत राणा गप्पा का बसल्या, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

 

 

Tags

follow us