Download App

Eknath Shinde : राम मंदिर हिंदुत्वाचे प्रतिक… बाळासाहेबांचे स्वप्न मोदींनी पूर्ण केले!

  • Written By: Last Updated:

Eknath Shinde : अयोध्या आणि राम मंदिर आमच्या श्रद्धेचा, आस्थेचा विषय आहे. राम लल्लावर आमची श्रद्धा आहे. दोन-तीन दिवसांपासून अयोध्येत राम भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अयोध्या हे स्थान हिंदुत्वाचे प्रतिक आहे. श्री राम मंदिर बनावे हे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होत ते पूर्ण होत आहे, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी सर्व खासदार आणि आमदार उपस्थित होते.

शिंदेंसाठी रोहित पवारांचे श्रीरामाकडे मागणे; म्हणाले, तुझ्या दर्शनासाठी आलेल्या राजाला.. – Letsupp

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, स्वप्नातील राम मंदिर प्रत्यक्ष सत्यात उतरत आहे. अयोध्येत राममय वातावरण आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या देखरेखीखाली राम मंदिराचे काम सुरू आहे. अयोध्येयत वेगाने विकास कामे सुरू आहे. स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत आहे. काही लोकं हिंदू धर्माबद्दल अफवा पसरवत आहे. विरोधकांना माझ्या नावाची, हिंदूंची अलर्जी झाली आहे.

अयोध्या आणि राम मंदिर हा आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. तीन वर्षांपूर्वी भाजप आणि शिवसेनेने एकत्र निवडणुका लढवल्या होत्या. पण, बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना लांब ठेवले होते. पण, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या बरोबर हातमिळवणी केली आणि सत्ता स्थापन केली, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

Tags

follow us