CM Eknath shinde Video : राष्ट्रवादीचे (NCP)नेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी नुकतीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. राज्य सरकारमध्ये अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath shinde) नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एका व्हिडीओमुळे जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, सरकारमध्ये अजितदादांच्या एन्ट्रीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा आहेत, त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी या फक्त अफवा असल्याचं म्हटलं आहे, मात्र त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर एकप्रकारचे टेन्शन दिसत आहे. (Eknath shinde Video ajit pawar entry in state government cm resignation rumours)
या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला की, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्य सरकारमध्ये अजितदादांच्या एन्ट्रीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाले आहेत. ते आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे टेन्शन दिसत आहे. मात्र त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हसून पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिले.
#WATCH| Maharashtra CM Eknath Shinde speaks on Ajit Pawar joining hands with BJP in the state
"Ajit Pawar has expressed confidence in PM Modi. He has accepted that there is development in the state and he has also shared our thoughts on having a double-engine govt in the… pic.twitter.com/XqYeUQYTXY
— ANI (@ANI) July 6, 2023
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी तर माझं काम करत आहे. महाराष्ट्रात जे काही झालं आहे. त्यामुळे आपण अजिबात नाराज नाही. उलट अजितदादांनी हे मान्य केलं आहे की, देशाचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)हेच चांगल्या पद्धतीने करु शकतात. पंतप्रधान मोदी हेच देशााला जागतिक महासत्ता करु शकतात, यावर विश्नास व्यक्त केला आहे.
चाहत्यांची प्रतिक्षा संपली; ‘या’ दिवशी येणार फरहान अख्तरची मेड इन हेवनचा सीजन 2
त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये गत वर्षभरात मुख्यमंत्री म्हणून मी आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जे काही कामं केली आहेत. हे पाहून अजितदादा प्रभावित झाले आणि त्यांनी राज्यातील सरकारला पाठिंबा दिला आहे. जेव्हा अजितदादांनी आमच्या राज्य सरकारमध्ये येण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी आपल्याला तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आमच्या वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही राज्यात सरकार स्थापन करताना जी विचारधारा ठरली आहे. बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आम्ही हिंदुत्वाचा विचार पुढे नेत असतानाच त्याला विकासाला जोडत आहोत. गत वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे की, हे विरोधी पक्षनेते असलेल्या अजितदादांनी हे स्वतः मान्य केले आहे.
अजितदादांनी राज्यात विकास होत असल्याचं मान्य केलं आहे. त्याचबरोबर राज्य सरकार करत असलेल्या विकासाला पाठिंबा देण्याचंही मान्य केलं आहे. आम्ही जे म्हणतो की, राज्यामध्ये डबल इंजिनचं सरकार आहे. तेच विचार अजितदादांचे आहेत, त्यामुळेच ते आमच्या बरोबर आले आहेत.
येणाऱ्या काळात राज्यात आणखी वेगाने कामं होतील. त्यामुळे मी नाराज असल्याच्या फक्त अफवा आहेत. अजितदादांच्या एन्ट्रीमुळे आपण अजिबात नाराज नाहीत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा ठणकावून सांगितले आहे.