‘मोदीजींचा बाप काढणाऱ्यांना महाराष्ट्र खड्ड्यात गाडेल’; एकनाथ शिंदेंचा इंडिया आघाडीला इशारा

Eknath Shinde India Alliance Warning In Thane Rally; ठाण्यात महायुतीच्या वतीने आयोजित ‘लोकशाही वाचवा आणि अराजकता हटवा’ पदयात्रेत ते बोलत होते.

Eknath Shinde India Alliance Warning In Thane Rally

Eknath Shinde India Alliance Warning In Thane Rally

Eknath Shinde India Alliance Warning In Thane Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता धडा शिकवेल, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडीला दिला आहे. “मोदीजींचा बाप काढणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता खड्ड्यात गाडेल,” अशा आक्रमक शब्दांत शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ठाण्यात महायुतीच्या वतीने आयोजित ‘लोकशाही वाचवा आणि अराजकता हटवा’ पदयात्रेत ते बोलत होते.

ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर वीज संकटाचे सावट, महानिर्मितीकडे अवघे चार दिवस पुरेल एवढाचं कोळशाचा साठा

या पदयात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा सांगत शिंदे यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. फेक नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या इंडिया आघाडी, राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि त्यांच्या बगलबच्यांना ही पदयात्रा मोठी चपराक असल्याचे ते म्हणाले.

“महायुतीची ही पदयात्रा लोकशाही वाचवण्यासाठी आणि अराजकता हटवण्यासाठी काढण्यात आली आहे. या पदयात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी महाराष्ट्र पूर्णपणे उभा राहील,” असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

मतदारांची नावं वगळल्याचा हिशेब द्यावाच लागेल; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांना इशारा

इंडिया आघाडीकडे आता कोणताही ठोस मुद्दा उरलेला नसल्याचा आरोपही त्यांनी केला. “इंडिया आघाडीला आता काही कामधंदा राहिलेला नाही. मोदीजींना शिव्या देणे, अमित शाह यांच्यावर टीका करणे, देशविरोधी आणि विकासविरोधी वक्तव्य करणे, एवढेच काम विरोधक करत आहेत,” अशी टीका शिंदे यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या देणे, मोदीजींचा बाप काढणे, मोदीजींचा जो बाप काढेल त्याला महाराष्ट्रातील जनता खड्ड्यामध्ये गाडेल. असेही शिंदे म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे ठाण्यातील महायुतीच्या पदयात्रेतून इंडिया आघाडीविरोधात आक्रमक राजकीय भूमिका मांडण्यात आली.

देशविरोधी शक्ती भारताचे विभाजन करण्याचे कट रचतेय; इंडिया आघाडीवर पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्लाबोल

दरम्यान, इंडिया आघाडीनेही दिल्लीत महारॅली काढली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या विरोधात ही काढण्यात येत आहे. या महारॅलीनंतर दिल्लीतील रामलीला मैदानात इंडिया आघाडीच्या नेत्यांची सभा होणार आहे.

Exit mobile version