Download App

Eknatha Shinde : …म्हणून तानाजी सावंतांना आरोग्य मंत्री केलं

  • Written By: Last Updated:

तानाजी सावंत यांच्या खूप साऱ्या शैक्षणिक संस्था आहेत, म्हणून त्यांना प्रथम शिक्षणमंत्री करायचं असे ठरवले होते. परंतु ज्यांच्या अधिक शिक्षण संस्था आहेत तोच मंत्री असला की वाद होतात म्हणून सावंतांना शिक्षण मंत्री न करता आरोग्य खात दिल. शिवाय तानाजी सावंत यांनी साखरेत पीएच डी केली आहे. त्यामुळे सावंतांना राज्यातील अतिशय महत्वाच्या अशा आरोग्य खात्याची जबाबदारी देण्यात आली. असे मुख्यमंत्री म्हणले ते ठाण्यात नवीन सरकारी हॉस्पिटलच्या उदघाटन कार्यक्रमात बोलत होते.

आरोग्य खात हे अतिशय महत्वाचं खात आहे. मी देखील या खात्याचा मंत्री राहिलेलो आहे. लोकात जाऊन काम करण्याची संधी यामुळे मिळाली. या खात म्हणजे अतिशय संवेदनशील आहे. याच्या माध्यमातून आपण लोकांचे जीव वाचवू शकतो. हे जगातील सर्वात मोठे पुण्य आहे. असे मी त्यावेळी सावंतांना सांगितले असे मुख्यमंत्री म्हणाले.

राहुल गांधींनी ‘हे’ काय केलं ?, भाजपने केला व्हिडिओ व्हायरल; पाहा काय घडलं ?

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले आरोग्य विभागाच्या माध्यमातून सावंतांनी अनेक सोयी सुविधा केल्या माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित अशा योजना देखील ते राबवत आहेत. तसेच त्यांनी यासाठी आरोग्य विभागाचे अनेक मोठं मोठे कॅम्प राज्यभर घेतली आहेत. या कॅम्प मध्ये मी देखील सहभाग घेतला आहे. तसेच राज्यभर लहान मुलानांच्या चाचण्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून घेतल्या जात आहेत. आणि हे सर्व तानाजी सावंत अतिशय जबाबदारीने करत आहेत त्यामुळे मी सावंतांना आरोग्य मंत्री केलं.

खासदार संजय सिंह यांची ईडीलाच मानहानीची नोटीस, ’48 तासांत माफी मागा, अन्यथा….’

आम्ही सरकारच्या माध्यमातून राज्यभरामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने 700 हॉस्पिटल उभारत आहोत. यामध्ये सर्व आजारावरील डॉक्टर देखील 24 तास लोकांच्या सेवेसाठी राहतील. तसेच 148 प्रकारच्या चांचण्या मोफत होतील तसेच औषधें देखील मोफत मिळतील असे यावेळी मुखमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Tags

follow us