राहुल गांधींनी ‘हे’ काय केलं ?, भाजपने केला व्हिडिओ व्हायरल; पाहा काय घडलं ?

राहुल गांधींनी ‘हे’ काय केलं ?, भाजपने केला व्हिडिओ व्हायरल; पाहा काय घडलं ?

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भारतीय जनता पार्टीचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय (Amit Malviya) यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला असून हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

या व्हिडिओवरून पुन्हा भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार वाद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सह सेकंदांचा हा व्हायरल व्हिडिओ राहुल गांधी त्यांचे शासकीय निवासस्थान सोडतानाचा आहे. यावेळी ते येथील कर्मचाऱ्यांशी हस्तांदोलन करत आहेत. त्यांची भेट घेत आहेत.

हस्तांदोलन केल्यानंतर त्यांनी आपले हात पँटला पुसताना दिसत आहेत. हा व्हिडिओ ट्विट करत मालवीय यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी त्यांच्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांशी हस्तांदोलन केल्यानंतर हात पँटीला पुसत आहेत. या कर्मचाऱ्यांनी वर्षानुवर्षे त्यांची सेवा केली असेल. मात्र तरीही असा तिरस्कार.. अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.

नेटकरी भाजपवर खवळले !

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत मालवीय आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. असे व्हिडिओ एडीट करून शेअर केल्याबद्दल नेटकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. भाजप आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली जात आहे. एका युजरने मालवीय यांना धारेवर धरत म्हटले की मालवीय यांना फक्त असे व्हिडिओ शोधणे, ते अर्धे कट करणे आणि आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी दिवसभर व्हायरल करत राहणे इतकेच काम शिल्लक राहिले आहे.

राहुल गांधींनी सोडलं घर 

दरम्यान, राहुल गांधी यांनी आज आपला सरकारी बंगला सोडला आहे. कालपर्यंत त्यांनी सरकारी बंगल्यातील सर्व सामान रिकामे केले होते आणि त्यांनी संपूर्ण बंगला खाली केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार दिल्लीतील 12, तुघलक लेन हा सरकारी बंगला आज राहुल गांधी यांनी लोकसभा सचिवालयाकडे सोपवला.

राहुल गांधी यांना दिलेल्या मुदतीनुसार आजच बंगला रिकामा करण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे आज संपूर्ण सामान हलवून स्वत: राहुल गांधी संबंधित मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांकडे चाव्या सोपविल्या असल्याचं बोललं गेलं.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube