खासदार संजय सिंह यांची ईडीलाच मानहानीची नोटीस, ’48 तासांत माफी मागा, अन्यथा….’
AAP MP Sanjay Singh sent defamation notice to ED officials : देशात विरोधी पक्षातील नेत्यांना ईडीकडून (ED) नोटीसावर नोटिसा पाठवून विरोधाकांची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षाच्या नऊ नेत्यांनी केद्रीय तपास यंत्रणांच्या मनमानी कारभाराबाबद पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होतं. मात्र, अजूनही ईडीच्या कारवाया कमी होत नाहीत. देशातील अनेक नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागलेला असतांनाच आता एका खासदारने थेट ईडीलाच नोटीस पाठवली.
आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी अबकारी मद्य धोरण प्रकरणाच्या आरोपपत्रात त्यांच्या नावाचा समावेश बनावटपणे केल्याबद्दल अंमलबजावणी संचालनालय (ED) अधिकार्यांविरुद्ध फौजदारी मानहानीची नोटीस पाठवली आहे. संजय सिंह यांनी ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा आणि कथित अबकारी मद्य घोटाळा प्रकरणाचा तपास करणारे तपास अधिकारी जोगेंद्र यांना ही मानहानीची नोटीस पाठवली आहे
कायदेशीर नोटीसमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी 48 तासांच्या आता माफी मागावी, असं सांगितलं. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. या नोटीसमध्ये संजय सिंह म्हणाले की, ईडीकडून मुद्दाम दिल्ली अबकारी प्रकरणाच्या आरोपपत्रात माझ्या नावाचा खोटा उल्लेख करण्यात आला होता, तर एकाही साक्षीदाराने माझे नाव घेतले नाही. असं असूनही माझी बदनामी करण्याच्या कटाचा एक भाग म्हणून ईडीने जावीवपूर्वक चार्जशीटमध्ये माझे नाव टाकल्याचे सिंह म्हणाले. माझ्याविरुद्ध फारसे साक्षीदार आणि पुरावेही नाहीत, तरीही माझे नाव बदनामी करण्यासाठी अबकारी प्रकरणात टाकण्यात आले, असे संजय सिंह म्हणाले.
Urfi Javed Biography : कोण आहे उर्फी जावेद? कुटुंब, कारकीर्द अन् आतापर्यंतचा प्रवास
आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी गुरुवारी सांगितले की, अबकारी धोरण प्रकरणाच्या आरोपपत्रात चुकीच्या पध्दतीने माझ्या नावाचा समावेश केल्याबद्दल अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी मानहानीचा खटला दाखल करणार आहे. दिल्लीचे माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे दिल्ली उत्पादन शुल्क धोरणासंदर्भात तिहार तुरुंगात बंद आहेत. याप्रकरणी सीबीआयने दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांचीही चौकशी करण्यात आली आहे.