मुंबई : संसदीय लोकशाहीमध्ये अहस्तक्षेपाचं तंत्र आणि सत्तेचं विकेंद्रीकरण या अत्यंत महत्त्वाच्या आधारशिला आहेत. भाजपच्या दंडेलशाहीच्या राजकीय कारकीर्दीत मात्र या दोनही तत्त्वांना हरताळ फासण्याचं आणि या आधारशिला खीळखिळ्या करण्याचं काम सातत्याने झालं. निवडणूक आयोगाने दिलेला निकाल बघण्याआधी, मागील तीन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांची स्टेटमेंट काय आले आहेत. ते तपासून पाहिले तर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात.
कारण ते म्हणत होते. धनुष्यबाण आम्हालाच मिळणार. निकाल आमच्याच बाजूने लागणार. तुम्ही कोऱ्या स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या. अशा वल्गना त्यांनी केल्या. हे पाहता स्वयत्त यंत्रणांमध्ये कीती हस्तक्षेप होत असेल हे चित्र स्पष्ट आहे. पण निवडणूक आयोग काही अंतिम नाही. आम्ही न्यायालयीन लढा लढणार आहोत. कराण प्रतिकांच्या राजकारणापेक्षा मुल्याधिष्टीत राजकारण हे प्रचंड मोठे असते. मुल्याधिष्टीत राजकारणात शिवसेनेचे अधिष्टान हे शिवसेना भवन, मातोश्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आहेत. अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली.
केंद्रीय निवडणूक निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना दिलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. जूनमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडाला भाजपने साथ दिली. शिंदे यांचा वापर करून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला कोंडीत पकडले. आता पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही शिंदेंकडे गेल्याने ठाकरे यांन राजकीयदृष्ट्या धक्का देण्यात भाजपला यश आले आहे. राजकीयदृष्ट्या बुलडोझरच फिरविण्यात आल्याची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Devendra Fadnavis : नाव व चिन्ह मिळाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे मनापासून अभिनंदन करतो
राज्याच्या राजकारणात आठ महिन्यांपूर्वी सर्वात मोठा भूकंप आला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात 40 आमदारांच्यासोबत बंडखोरी केली होती. एकनाथ शिंदे सर्व बंडखोर आमदारांना आपल्यासोबत घेऊन सूरत, त्यानंतर गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जाऊन राज्यात नवं सरकार स्थापन केलं होते. दरम्यान, सत्तास्थापनेनतंर शिवसेना कुणाची? हा वाद उफाळून आला होता. या निर्णयावर शिवसेनेने आक्षेप घेतला असून सत्यमेव जयते ऐवजी असत्यमेव जयते, असे म्हणावेसे वाटते, अशी प्रतिक्रिया पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
त्यानंतर ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला होता. गेल्या आठ महिन्यांपासून याबाबत सुनावणी सुरु होती. निवडणूक आयोगात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झालेला होता. त्यानंतर कधीही निकाल येणं अपेक्षित होतं. त्यानुसार आज संध्याकाळी निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आलाय. या निकालामुळे शिवसेना कुणाची याचा निर्णय अखेर झाला. केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर आपला निर्णय जाहीर केला. या निकालात केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळेल, असं स्पष्ट लिहिलं आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीवर काय परिणाम होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.