Download App

अचानक ७६ लाख मतांची वाढ कशी झाली?, पटोलेंच्या प्रश्नांवर EC कडून स्पष्टीकरण, ‘संध्याकाळी 6 नंतरही…’

राज्यात ७६ लाख मतांची वाढ कशी झाली? असा सवाल कॉंग्रेस नेते नाना पटोलेंनी केला. यावर आता निवडणूक आयोगाने भाष्य केलं.

  • Written By: Last Updated:

Election Commission On Nana Patole Alligation : विधानसभेच्या निवडणुकीत (Vidhansabha Election) महायुतीला (Mahayuti) बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झालं. तर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून मतमोजणीसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) वाढीव मतदानावरून निवडणूक आयोगावर टीका केली. जनतेची मतं चोरण्याचं आणि डाका टाकण्याचं काम निवडणूक आयोग (Election Commission) करत आहे, असं म्हणत राज्यात ७६ लाख मतांची वाढ कशी झाली? असा सवाल पटोलेंनी केला. यावर आता आयोगाने भाष्य केलं.

ताहिर राज भसीनचा जागतिक हिट शो : ‘ये काली काली आंखें 2’ 10 देशांत गाजतोय 

निवडणुक आयोगाने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पटोलेंनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं. 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, संध्याकाळी 5 वाजता मतदानाची टक्केवारी 58.22% (अंदाजे) होती आणि अंतिम मतदानाची टक्केवारी 66.05% आहे.  मतांची टक्केवारी वाढणं हे मान्य आहे.  कारण संध्याकाळी 6 वाजेनंतर रांगेत उभ्या असलेल्या शेवटच्या मतदाराने मतदान करेपर्यंत मतदान चालूच असते. 2019 मध्येही, संध्याकाळी 5 वाजतेपर्यंत मतदानाची टक्केवारी 54.43% (जवळपास) होती. तर अंतिम वेळी मतदान 61.10% इतकं झालं होतं, असं निवडणूक आयोगाने म्हटलं.

महाराष्ट्रातील नागरी आणि निमशहरी भागात मोठ्या संख्येने मतदार संध्याकाळी मतदानाला येतात, असंही आयोगाने स्पष्ट केलं.

‘तर… मी पुढील सहा महिन्यांत निवृत्ती घेईन’; शहाजी बापू पाटलांचं मोठं वक्तव्य

आयोगाने पुढं लिहिलं की, हे लक्षात घेतलं पाहिजे की, मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दोन तासांच्या मतदानाची माहिती केवळ तोंडी दूरध्वनीवरून घेतली जाते.

पटोले काय म्हणाले?
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत हा गंभीर चिंताजनक प्रकार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वाजता ते ६५.०२ टक्के तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के झाल्याचे सांगितले, यात एकूण ७.८३ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला? सवाल पटोलेंनी केला.

सायंकाळी 5:30 वाजेनंतर जे मतदान झालं, त्याचे फोटो दाखवा, हे मतदान कुठल्या सेंटवर झालं? साडेसात टक्क्यांनी मतदान कसे वाढले? या सगळ्यांचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यायला हवे. निवडणूक आयोगाने लोकांची मते चोरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पटोलेंनी केला.

follow us