‘तर… मी पुढील सहा महिन्यांत निवृत्ती घेईन’; शहाजी बापू पाटलांचं मोठं वक्तव्य
Shahaji Bapu Patil Statement On Retirement From Politics : राज्यात अजून मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटलेला (Maharashtra Politics) नाही. दरम्यान अशातच सांगोल्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. एकनाथ शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी राजकीय निवृत्तीची मोठी घोषणा केलेली आहे. विधानसभा निवडणुकीत सांगोल्याचे शहाजी बापू पाटील यांचा पराभव झालाय. त्यानंतर सांगोल्यात चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शहाजी बापू पाटलांनी हे वक्तव्य केलंय.
शहाजी बापू पाटील नेमकं काय बोलले?
पुढील सहा महिन्यांत सांगोल्याच्या दुष्काळी भागात शेतीसाठी पाणी न आणल्यास राजकारणातून निवृत्ती घेईन; असं मोठं वक्तव्य शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलंय. शेवटच्या श्वासापर्यंत सांगोला तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी काम करत राहणार असल्याचं देखील शहाजीबापू पाटलांनी यावेळी स्पष्ट केलंय. तसेच सांगोल्यामधील अनेक भागांत पाण्याचा प्रश्न निर्माण होतोय, अन् दुष्काळ जाणवत (Shahaji Bapu Patil Statement On Retirement) असतो. त्यामुळे निवडणूकीत जरी पडलोतरी एक वर्षाच्या आतमध्ये सांगोल्याच्या 14 गावांतील शेतात पाणी नाही आलं तर राजकीय निवृत्ती घेणार असल्याचं शहाजी बापू पाटील म्हणाले आहेत.
निवडणूक आयोगाचा जनतेच्या मतांवर दरोडा; अचानक ७६ लाख मतदान कसं वाढलं?, पटोलेंचा सवाल…
मी मृत्यूच्या दाढेत असताना देखील हात जोडून शिंदे साहेबांना विनंती केली. येत्या सहा महिन्यात तुमच्या रानात नाही पाणी आणलं, तर मी राजकारणातून निवृत्ती घेणार, असं त्यांनी स्पष्ट केलंय. परंतु ज्यावेळी एखादं वैभव निर्माण होतं, त्यावेळी अनेकांना द्वेष होत असतो. गुवाहाटीला गेल्यानंतर अन् परत आल्यानंतर एक प्रसिद्धीचं वलय मला मिळालं, त्यानंतर मोठमोठ्या नेत्यांच्या मनात धडकी भरली. काहीही करून याला पाडायचं, पराभव करायचा असं त्यांनी ठरवलं. कारण मी स्पष्टवक्ता आहे, असं देखील शहाजी बापू पाटील म्हणाले आहेत.
मुंबईत PM मोदींना जिवे मारण्याची धमकी, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
टीव्हीच्या समोर मी गेलो तेव्हा कधी असत्य बोलणार नाही, बोललेलो देखील नाही. माझ्या राजकारणावर याचा काय परिणाम होईल, याचा देखील विचार केलेला नाही. अनेकांनी मला सल्ले दिले, इतकं स्पष्ट बोलू नका तुम्हाला अडचण होईल. मृत्युला देखील मी अडचण समजत नाही, तर राजकारणाला काय अडचण समजणार असं वक्तव्य देखील शहाजी बापू पाटलांनी केलंय.