महाराष्ट्र जिंकल्यानंतर दिल्ली जिंकण्याचा निर्धार ; अजित पवारांनी केली मोठी घोषणा

महाराष्ट्र जिंकल्यानंतर दिल्ली जिंकण्याचा निर्धार ; अजित पवारांनी केली मोठी घोषणा

Ajit Pawar contest elections in Delhi : राज्यात नुकत्याच विधानसभा पार पडल्या आहेत. दरम्यान आज अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठी घोषणा केलीय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दिल्लीत निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यात आलीय. लवकरच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्याचा निर्धार असल्याचं देखील पत्रकार परिषदेत अजित पवारांनी म्हटलंय. प्रत्येक राज्यात आपले उमेदवार (NCP) निवडून येवू शकतात, असा विश्वास अजित पवारांना आहे.

प्रफुल पटेलांकडून दिल्लीत निवडणूक लढवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. विधानसभेच्या निकालानंतर ईव्हीएमवर आक्षेप घेण्यात आला, असं देखील अजित पवार म्हणाले आहेत. दिल्लीत माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी मोठी घोषणा (elections in Delhi) केलीय. अजित पवारांचा पक्ष विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं समोर आलंय.

तुम्ही घरालगतचा परिसर सुरक्षित ठेवू शकत नाही, देश काय सुरक्षित ठेवणार?, केजरीवालांचा गृहमंत्र्यांना सवाल…

आज संध्याकाळी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महाआघाडीच्या प्रमुख तीन नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वीच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होऊ शकतात, अशी माहिती समोर येतेय. महायुतीच्या या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र भाजपच्या सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांची संसदेत भेट घेतली. आज रात्री महायुतीच्या बैठकीतच सरकार स्थापनेचा फॉर्म्युला ठरणार असल्याची माहिती मिळत आहे.

विधानसभेच्या निकालानंतर नगरमध्ये ठाकरे गटाला गळती, शिवसैनिक वेगळ्या वाटेवर…

सहा आमदारांसाठी एका मंत्रिपदाच्या सूत्रावर सरकारमधील विभागांच्या वितरणात प्रत्येक मित्रपक्षाचा वाटा ठरवण्याचा विचार केला जाईल. त्यानुसार भाजपला 21 ते 22 मंत्रीपदे, शिवसेनेच्या शिंदे गटाला 10 ते 12 आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाला 8 ते 9 मंत्रिपदे मिळतील, असा अंदाज आहे. कृषी, अन्न आणि नागरी पुरवठा, महिला व बालकल्याण, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा, ग्रामविकास, सहकार आणि पणन ही खाती आपल्याकडे ठेवण्याचा आग्रह अजित पवार यांच्याकडे असणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube