मुंबई : सध्या राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरू आहे. गेल्या अधिवेशनात महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वासाचा प्रस्तावर दाखल करण्यात आला. मात्र या प्रस्तावाचे पुढे काय झालं? याबाबत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांना काहीच माहिती नसल्याचं समोर आलं आहे. आज अधिवेशनात पटोलेंनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हस्तक्षेप करत पटोलेंना टोला लगावला.
शिंदे – फडणवीस सरकार राज्यात सत्तारुढ झाल्यानंतर नागपूरात दोन आठवड्यांचे विधीमंडळ अधिवेशन झाले होते. पहिल्या दिवसापासून हे अधिवेशन राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर चर्चेत राहिले होते. अधिवेशन आटोपण्याच्या पुर्वसंध्येला महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला गेला होता. नार्वेकर हे विविध मुद्यांवर सभागृहात ज्यावेळी चर्चा सुरु असते, त्यावेळी विरोधकांना बोलू देत नाहीत, असा मविआच्या नेत्यांकडून आरोप करण्यात येत होते. विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये याबाबत नाराजी होती. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात नार्वेकरांविरोधात अविश्वास ठराव मांडल्या गेला होता. मविआच्या नेत्यांकडून विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना तसे पत्रही देण्यात आले होते. दरम्यान, त्या अविश्वास ठरावाची कुठलाही माहिती मिळाली नसल्याच नाना पटोले यांनी सांगितलं.
आज अविश्वास ठरावासंदर्भात बोलतांना नाना पटोले यांनी काही प्रश्न उपस्थित, अध्यक्ष महाराज, अविश्वास प्रस्तावाचे पुढं काय झालं? आम्ही मागच्या अधिवेशनात तुमच्या विरोधात अविश्वास ठराव दिला होता. त्याची माहिती मिळाली नाही. त्या अविश्वास ठरावाची माहिती मिळायला पाहिजे. त्याची काहीच माहिती दिलेली नाही, असं पटोले म्हणाले.
मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा तातडीने द्यावा ; सभागृहात छगन भुजबळांची मागणी
दरम्यान, पटोलेंना उत्तर देतांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं की, मागच्या वेळी जो तुम्ही अविश्वास ठराव दिला होता. त्याचं उत्तर मी दुसऱ्याच दिवशी पाठवलं आहे. हवं तर मी आज पुन्हा तुम्हाला पत्र देतो, असं नार्वेकर म्हणाले. यावेळी सभागृहात उपस्थित देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. तुम्ही जरा पीएकडून अधिकची माहिती घ्या नाना, असा टोला यावेळी फडणवीसांनी लगावला .