Download App

पंकजा मुंडे, खोत, फुके यांच्यासह पाच जणांना विधानपरिषदेची उमेदवारी, BJP चे सोशल इंजिनिअरिंग जोरात

ओबीसी नेत्या पंकजा मुंडे, पुण्याचे योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत या पाच जणांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Pankaja Munde Candidate Legislative Council मुंबई: विधानसभा सदस्याच्या कोट्यातून विधानपरिषदेचे सदस्य निवडून देण्यात येणार आहेत. विधानपरिषदेच्या अकरा जागा रिक्त असून, त्यातील पाच जागा भाजपला (BJP) मिळणार आहेत. भाजप केंद्रीय नेतृत्वाने पाच नाव निश्चित केले आहे. ओबीसी नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde), पुण्याचे योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत या पाच जणांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी देताना भाजपने सोशल इंजिनिअरिंग साधले आहे. यादीत चार नावे हे ओबीसी समाजातील आहे. तर एक उमेदवार हे दलिस समाजातील आहेत. (Five persons including Munde, Khot are nominated to Legislative Council)

शिंदे गटाला नगरमधून धक्का! दिलीप सातपुते उद्धव ठाकरे गटाच्या वाटेवर?

भाजपने उमेदवारी जाहीर करताना सामाजिक समिकरणेही जुळवून आणले आहे. ओबीसी नेत्यांबरोबर दलित समाजाला उमेदवारी दिली आहे. यातील अमित गोरखे हे नवे नाव आहे. ते पिंपरी चिंचवड येथील रहिवासी आहेत. ते भाजपच्या आयटी सेलचे ते काम पाहतात. ते दलित समाजातून येतात. पुण्यातून योगेश टिळेकर यांनाही उमेदवारी मिळाली आहे. टिळेकर हे भाजपचे हडपसरचे मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. ते भाजपच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत.

Video : राज्यातील 50 लाख युवा खोटं बोलत आहेत का?; खडा सवाल विचारत रोहित पवार संतापले


तर रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांनाही विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली आहे. महायुतीतील घटक पक्ष म्हणून भाजपने स्वतःच्या कोट्यातून खोत यांना उमेदवारी दिली आहे. सदाभाऊ खोत या पूर्वी विधान परिषदेवर होते. त्यांना भाजपने मंत्रिपदही दिले होते. तर डॉ. परिणय फुके यांना उमेदवारी मिळाली असून, ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहे. फुके हे भंडारा जिल्ह्यातील आहेत.


पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपणार

पंकजा मुंडे या भाजपमधून साइडलाइन झाल्या होत्या. त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहाच्या राजकारणात आणण्यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात येत होते. लोकसभेला प्रितम मुंडे यांचे तिकीट कापून ते पंकजा मुंडे यांना देण्यात आले होते. परंतु जातीय समीकरणे वेगळी ठरले. त्यात मराठा आरक्षणाचा आंदोलनाचा फटका पंकजा मुंडे यांना बसला. त्यात लोकसभेला साडेसहा हजार मतांनी पराभूत झाल्या. परंतु आता विधानपरिषदेच्या माध्यमातून त्यांचा राजकीय वनवास संपणार आहे. राज्यात मुंडे यांच्या रुपाने मोठा ओबीसी चेहरा आहे. येत्या विधानसभा निवडणुकीचा दृष्टीने हा चेहरा महत्त्वाचा आहे. त्या विधानसभा भाजपला जास्त जागा जिंकून देऊ शकतात. त्यामुळेच मुंडे यांना विधानपरिषदेवर घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.


रावसाहेब दानवे, हर्षवर्धन पाटलांना संधी नाहीच

माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे लोकसभेला पराभूत झाले. ते विधानपरिषदेसाठी इच्छुक होते. तर भाजपमधील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे विधानपरिषदेसाठी इच्छुक होते. परंतु त्यांच्या नावाला केंद्रातून पसंती मिळालेली नाही.

follow us

वेब स्टोरीज