भाजपच्या लाडक्या भावाने स्वत:च्या बहिणीली किती छळलं…; आव्हाडांचा अजितदादांवर निशाणा

भाजपच्या लाडक्या भावाने स्वत:च्या बहिणीली किती छळलं…; आव्हाडांचा अजितदादांवर निशाणा

Jitendra Awhad : राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याचा 2024-25 चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी महिलांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. मध्य प्रदेशच्या लाडली बेहन योजनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने लाडकी बहीण योजन (Ladki Bahin Scheme) सुरू केली. याच योजनेवरून आता आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

आनंदाची बातमी! शिंदे सरकार ‘या’ कुटुंबांना देणार वर्षाला 3 मोफत सिलेंडर 

सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले, भाजपच्या लाडक्या भावाने लाडकी बहीण योजना आणली. पण गेल्या चार महिन्यात स्वत:च्या लाडक्या बहिणीला त्यांनी किती छळलं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. हा अर्थसंकल्प फसवा आहे. कारण, मूल्यांकन आणि सुसूत्रता आणण्यासाठी आम्ही उच्चस्तरीय समिती नेमणार आहोत, असे त्यांनीच अर्थसंकल्पात लिहिले आहे. याचा अर्थ हा अर्थसंकल्प मूल्यमापन न करता, सुसूत्रिकरण न करता आणला आहे, अशी टीका आव्हाडांनी केली.

आम्ही बहिणींसह भावालाही न्याय दिला, त्यांनी फक्त लाडका बेटा योजनाच राबवली; CM शिंदेंचा ठाकरेंना टोला 

तर वडेट्टीवार म्हणाले, अर्थमंत्र्यांनी आज विधानसभेत फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प सादर केला. अडीच वर्षे केवळ घोटाळे, टेंडर, कमिशन आणि टक्केवारी यातून मालामाल झालेल्या या महाभ्रष्टाचारी सरकारने आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या नावाखाली महायुतीचा निवडणूक जाहीरनामाच सादर केला, अशी टीका त्यांनी केली.

ठाकरे काय म्हणाले?
अर्थसंकल्प म्हणजे लबाडा घरचं आवतन आहे. यात फक्त नुसती आश्वासनांची अतिवृष्टी, थापांचा महापूर आहे, अशी टीका ठाकरेंनी केली. ते म्हणाले, सरकारने महिलांसाठी लाडकी बहिणी योजना सुरू केली. पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका. माता बहीणींसाठी जरूर योजना आणा. पण, बेकार असलेल्या तरुण भावांसाठीही लाडका भाऊ, लाडका पुत्र अशी योजना आणा, असं ठाकरे म्हणाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज