आम्ही बहिणींसह भावालाही न्याय दिला, त्यांनी फक्त लाडका बेटा योजनाच राबवली; CM शिंदेंचा ठाकरेंना टोला

आम्ही बहिणींसह भावालाही न्याय दिला, त्यांनी फक्त लाडका बेटा योजनाच राबवली; CM शिंदेंचा ठाकरेंना टोला

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात लाडकी योजनेसारख्या अनेक योजनांची घोषणा केली. दरम्यान, याच योजेनवरून उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सरकारवर जोरदार टीका केली होती. त्या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) जोरदार समाचार घेतला.

Rockstar DSP ने करावा भारत दौरा; चाहत्यांनी व्यक्त केली इच्छा! 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता शिंदे म्हणाले लाडकी बहीण योजनेप्रमाणे आम्ही लाडका भाऊ योजनाही आणली. मात्र आम्हाला आम्हाला नावं ठेवणाऱ्यांनी लाडका बेटा योजना अडीच वर्षे राबवली त्याचं काय?, असा टोला शिंदेंनी लगावला.

…तर माझा उदो उदो केला असता; ‘चादर लगी फटने, खैरात लगी बटने’ वर अजितदादांचे जोरदार प्रत्युत्तर 

शिंदे म्हणाले, अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. जेव्हा आम्ही सर्वसामान्यांचे सरकार म्हणतो, तेव्हा त्यात शेतकरी, कष्टकरी, मजूर, महिला-भगिनी, तरुण, ज्येष्ठ आणि कामगार हे सगळे येतात. आम्ही दिलेला शब्द तंतोतंत पाळू. हा निर्धाराचा संकल्प आहे, असं शिंदे यांनी दिली.

अर्थसंकल्पात सर्व पैशांची तरतूद करून या सर्व योजना केलेल्या आहेत. या योजनांची पूर्णपणे राबवल्या जातील. दुधाच्या दरात पाच रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सोयाबीन आणि कापसासाठी साडेचार हजार कोटींची तरदूत केली. शेतकऱ्यांना काय दिले, असे विचारणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, गेल्या दोन वर्षांत सर्व निकष बदलून शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून 45 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. मात्र खोटं बोला, पण रेटून बोला, हे विरोधकांचं धोरण आहे, अशी टीका शिंदे यांनी केली.

ठाकरे काय म्हणाले?
अर्थसंकल्प म्हणजे लबाडा घरचं आवतन आहे. यात फक्त नुसती आश्वासनांची अतिवृष्टी, थापांचा महापूर आहे, अशी टीका ठाकरेंनी केली. ते म्हणाले, सरकारने महिलांसाठी लाडकी बहिणी योजना सुरू केली. पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका. माता बहीणींसाठी जरूर योजना आणा. पण, बेकार असलेल्या तरुण भावांसाठीही लाडका भाऊ, लाडका पुत्र अशी योजना आणा, असं ठाकरे म्हणाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube