Download App

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचे निधन, वयाच्या 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी आज वयाच्या 72 व्या वर्षी दिल्ली एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. बिहारचे डेप्युटी सीएम सम्राट चौधरी

Sushil Modi Passed Away :  बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी (Sushil Modi) यांनी आज वयाच्या 72 व्या वर्षी दिल्ली एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. बिहारचे डेप्युटी सीएम सम्राट चौधरी (Samrat Chaudhary) यांनी X वर ही माहिती दिली. सुशील मोदी कर्करोगाने (cancers) ग्रस्त होते.

माहितीनुसार, सुशील मोदी गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाने त्रस्त होते. त्यांनी 3 एप्रिल 2024 रोजी  X वर पोस्ट शेअर करत, गेल्या 6 महिन्यांपासून  कॅन्सरशी झुंज देत असल्याची माहिती दिली होती.

त्यांनी आपल्या  पोस्ट मध्ये म्हटले होते की, मला वाटते की, आता लोकांना सांगायची वेळ आली आहे. मी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) पक्षासाठी प्रचार करू शकणार नाही, याबाबात मी सर्व काही पंतप्रधानांना सांगितले आहे. असं त्यांनी X वर  लिहिले होते.

Ahmednagar Lok Sabha Election : यंदा अहमदनगर – शिर्डीमध्ये कमी मतदान, फटका कोणाला?

पाटणा विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीतून सुशील मोदींनी राजकारणात प्रवेश केला होता. या निवडणुकीत ते सरचिटणीस म्हणून निवडून आले होते. जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीच्या हाकेवर सुशील मोदींनी आंदोलनात उडी घेतली आणि अटक झाल्यानंतर 19 महिने ते तुरुंगात राहिले.

follow us

वेब स्टोरीज