Download App

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका

Breaking News : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका बसला आहे. हर्षवर्धन जाधव हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी गेले असताना त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हर्षवर्धन जाधव यांची प्रकृती आता स्थीर असल्याची माहिती देण्यात आली आहे.(former mla harshavardhan jadhav heart attack central minister nitin gadkari house)

…त्यामुळे अजित पवार अडचणीत येतील पण मुख्यमंत्री होणार नाही; शिंदे गटाच्या आमदाराने केला दावा

मिळालेली माहिती अशी की, माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दिल्लीमधील निवासस्थानी गेले होते. तेथे त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर हर्षवर्धन जाधव यांना नवी दिल्लीमधील आरएमएल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी जाधव यांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती दिली आहे.

शरद पवारांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी? राष्ट्रवादीशी चर्चेनंतर थेट PM मोदींंनी दिली मोठी ऑफर

हर्षवर्धन जाधव हे छत्रपती संभाजीनगरमधील कन्नडचे माजी आमदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. माजी आमदार जाधव यांनी मार्च तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिल्यांदा 13 आमदार निवडून आले होते, त्यात हर्षवर्धन जाधव जाधव हे देखील होते. कन्नड मतदारसंघामधून ते विजयी झाले होते. त्यानंतर मात्र मनसेला रामराम करत हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

शिवसेनेच्या तिकिटावरही त्यांनी निवडणूक जिंकली. मात्र शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर त्यांनी स्वतःच्या पक्षाची स्थापना केली होती. मात्र आता मार्च महिन्यात त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मात्र राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

Tags

follow us