Download App

वेळीच जर कारवाई केली असती, तर… परभणीतील तणावानंतर विजय वडेट्टीवार म्हणाले…

  • Written By: Last Updated:

Vijay Wadettiwar Reaction On Insult Of Constitution : परभणीत आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाचे प्रतिकात्मक पुस्तक फाडल्याच्या निषेधार्थ (Insult Of Constitution) बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान संतप्त होत लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी घोषणाबाजी करत महामार्ग रोखून धरला. दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. परभणीत आज (बुधवारी) बंद पुकारण्यात आलाय. यावर आता माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची (Vijay Wadettiwar) प्रतिक्रिया समोर आलीय.

‘विटंबनेमागचा मास्टरमाईंड शोधा, हा कट सुनियोजित…’; वर्षा गायकवाड यांना वेगळीच शंका…

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या घटनेनंतर एक सोशल मीडिया पोस्ट समोर आलीय. परभणी शहरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली ( Insult Of Constitution In Parbhani) आहे. सदर घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासन आणि पोलीस दलाने तात्काळ योग्य कारवाई करायला हवी होती. मात्र ते न झाल्यामुळे आज परिस्थिती चिघळली आहे.

ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवरून नाना पटोलेंचा थेट वार; म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळेंना..

पोलिसांनी संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. तसेच सरकारने जनतेला अश्वासित करावे, की या प्रकरणात कोणतीही हयगय केली जाणार (Parbhani News) नाही. संविधान प्रेमी जनतेने देखील शांतता आणि संयम बाळगावा आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करतो, असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, भारतीय लोकशाहीच्या पवित्र ग्रंथ आम्ही मानतो, त्या संविधान ग्रंथाची विटंबना झाली आहे. प्रशासनाने वेळीच जर कारवाई केली असती, तर अशा प्रकारचा उद्रेक झाला नसता असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सरकारने विटंबणा करणाऱ्यानावर त्वरित कारवाई करावी तसेच राज्यातील संविधान प्रेमि जनतेने शांतता बाळगावी, असं देखील त्यांनी म्हटलंय.

संविधानाच्या अवमानावरून महाराष्ट्रातील परभणीमध्ये अचानक हिंसाचार उसळला त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. दरम्यान अनेक भागांमध्ये जाळपोळ करण्यात आली होती. संविधानाचा अवमान करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलकांकडून केली जातेय. पोलीस परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहेत. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील सोडण्यात आल्या.

follow us