Sanjay Raut on G20 Summit : राजधानी दिल्लीत आजपासून G20 शिखर संमेलन (G20 Summit) सुरू झाले आहे. भारताच्या अध्यक्षतेत पहिल्यांदाच संमेलनाचे आयोजन होत आहे. या संमेलनासाठी जी 20 राष्ट्रांचे प्रमुख भारतात दाखल झाले आहेत. या सर्व राष्ट्रप्रमुखांसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डीनर आयोजित केला आहे. या डीनरसाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांना आमंत्रित केलेले नाही. यावरून विरोधकांकडून मोदी सरकावर टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही जोरदार प्रहार केला आहे.
राजस्थानमध्ये CM शिंदेंची ताकद वाढली! गेहलोत सरकारला जेरीस आणणारे ‘गुढा’ शिवसेनेत
राऊत म्हणाले, जी 20 आहे की मोदी 20 आहे असा प्रश्न आम्हाला पडला आहे. या देशात सगळे राष्ट्राध्यक्ष येथे आलेत. ते आल्याने चीनने जी जमीन गिळली ती परत मिळणार आहे का?, भारतावरील कोट्यावधींचं कर्ज माफ होणार आहे का? किती खर्च झालाय तरीही अशा प्रकारच्या बैठका महत्वाच्या असतात. प्रश्न हा आहे की चीनने आमची किती जमीन गिळली. चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग, रशियाचे पुतिन आले नाहीत. या बैठकीतून काय मिळणार? आमचं लक्ष लद्दाखमध्ये चीनने गिळलेल्या जमिनीकडे आहे ती जमीन परत मिळणार असेल तर आम्ही या बैठकीचं स्वागत करू, असेही राऊत म्हणाले. पण जर या बैठकीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची ताकद वाढणार असेल वाढली आहे तर ते नक्कीच कौतुकास्पद आहे.
राजाचे मन छोटे असेल तर असे होते. तुम्ही देवेगौडा, मनमोहन सिंग यांना बोलावलं. ते प्रकृतीमुळे येऊ शकले नाहीत. मात्र विरोधी पक्षाचे नेते खर्गेंना बोलवत नाहीत. यावरून तुमच्या मनात भीती असल्याचे स्पष्ट होत आहे. तुम्ही देशात जे काही करुन ठेवता त्याची पोलखोल होईल. विरोधी पक्षनेते ती करत असतात. राज्यकर्त्यांचे मन मोठे असावे लागते. तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांचा द्वेष करताय ते चुकीचे आहे, असेही राऊत म्हणाले.
G20 ची शिखर परिषद आज 9 आणि 10 सप्टेंबरला दिल्लीत पार पडत आहे. भारताला पहिल्यांदाच या परिषदेचं यजमानपद मिळालं आहे. यासाठी जगभरातील अनेक दिग्गज नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी या परिषदेला संबोधिक केलं. G20 परिषदेची शिखर परिषदेला संबोधित करताना सुरूवातीलाच पंतप्रधानांनी सर्व देशांच्या प्रतिनिधींचं स्वांगत करताना म्हटलं की, ‘भारतात आपलं स्वागत आहे.’ यावेळी त्यांनी देशाच्या नावाचा इंडिया असा उल्लेख करणं टाळलं असल्याचं पाहायला मिळालं.