Download App

गौतमीने सांगितले इंदुरीकर महाराजांना पैशाचे गणित, तीन लाख रुपये घेतले असते तर…

  • Written By: Last Updated:

मुंबई : आपल्या नृत्याच्या अदाकारीने तरुणाईला वेड लावणारी गौतमी पाटील (Gautami Patil) आणि विनोदी शैलीसाठी प्रसिद्ध असलेले कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कोण किती पैसे घेतं यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. गौतमीच्या तीन गाण्यासाठी तीन लाख मोजण्याची तयारी असते पण आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही, अशी खंत कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी व्यक्त केली होती. यावर आता गौतमी पाटील हिने स्पष्टीकरण दिलं आहे.

महाराजांविषयी मी काय बोलणार. फक्त इंदुरीकर महाराजांचा गैरसमज झाला आहे, असं गौतमी पाटील म्हणली. इंदुरीकर महाराज सांगतात तेवढं माझं मानधन नाही. हे प्रेक्षकांनी देखील ध्यानात घ्यावं. मी तीन गाण्याला तीन लाख रुपये घेतले असते तर लोकांनी माझ्या कार्यक्रमाचे आयोजनच केले नसते. तीन गाण्यासाठी तीन लाख कोणीही देणार नाही, असं गौतमी पाटीलने म्हटलं आहे.

Sanjay Raut : हे भिजलेल काडतूस उडत देखील नाही; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा

तसंच आमच्या टीममध्ये 11 मुली आहेत. आमची एकूण 20 जणांची टीम आहे. या सर्वांचा खर्च मोठा आहे. त्यामुळे मानधन आम्ही घेतो. पण महाराज सांगतात तेवढं घेत नसल्याचं गौतमी पाटीलने स्पष्ट केलं आहे.

इंदुरीकर महाराजांची खंत
गौतमीच्या तीन गाण्यासाठी तीन लाख मोजण्याची तयारी असते पण आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही. आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतो. मात्र गौतमीने ती गाणे वाजविले की तीन लाख रुपये मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी, राडा तर काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधे संरक्षणही दिले जात नाही, या शब्दांत इंदुरीकर महाराजांनी खंत व्यक्त केली होती.

Tags

follow us