Sanjay Raut : हे भिजलेल काडतूस उडत देखील नाही; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा

Sanjay Raut : हे भिजलेल काडतूस उडत देखील नाही; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा

Sanjay Raut Vs Devendra Fadanvis :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. काल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांना फडतूस म्हटले होते. यावरुन भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधत मी फडतूस नाही तर काडतूस असल्याचे म्हटले आहे. यावरुन संजय राऊतांनी आता पुन्हा फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

डिक्शनरीमध्ये फडतूसचा अर्थ हा मिनींगलेस व वर्थलेस असा आहे. बिनकामाचे लोक असा याचा अर्थ होतो. हे सरकार बिनकामाचे आहे, त्याला फडतूस शब्द वापरला आहे आणि हा फडतूस शब्द वापरल्याने भिजलेलं काडतूस एवढे आत जायची काय गरज आहे. तुम्ही काडतूस असाल पण अशी भिजलेली काडतूसं महाराष्ट्राने भरपूर पाहिली आहेत. भिजलेलं काडतूस उडत नाही. तुमचं खरं काडतूस ईडी व सीबीआय आहे, म्हणून तुमच्यामध्ये मस्ती आहे. हे तुमचं ईडी व सीबीआय बाजूला ठेवून या मग आम्ही काडतूस कुठे घुसतं ते दाखवतो, असे म्हणत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

https://letsupp.com/maharashtra/trupti-desai-will-contest-election-against-supriya-sule-31474.html

ठाण्यामध्ये आमच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांच्यावर शिंदे गटाच्या टोळीने हल्ला केला. त्यावर गृहमंत्री काही बोललेले नाहीत. मंत्रालयासमोर तीन महिलांनी आत्महत्या केली, याबाबत गृहमंत्र्यांना काही माहिती नाही. हे गृहमंत्री झाल्याने आमची अडचण झाली नसून सगळ्या महाराष्ट्राची अडचण झाली आहे, अशा शब्दात राऊतांनी फडणवीसांना सुनावले आहे.

Sushma Andhare; याचा अर्थ भक्तांची चॉईस किती फडतूस आहे हे लक्षातच आलं असेल?

यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देखील निशाणा साधला. बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडू देणार नाही, असे म्हटले होते. त्यावर राऊतांनी तुमचे 2019 साली आमदारकीचे तिकीट का कापले ते जाहीर करा, असा टोला लगावला आहे. त्यावेळी तुम्हाला व तुमच्या पत्नीला कुणालाही तिकीट दिले नाही. तुम्ही जो वीज खात्यात भ्रष्टाचार केला होता त्यामुळे दिल्ली हायकमांडने तुमचे तिकीट कापले होते, असे म्हणत राऊतांनी बावनकुळेंवर निशाणा साधला आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube