Download App

Girish Mahajan : ‘अजितदादा, तुम्हाला गद्दारीवर बोलण्याचा अधिकार नाही’

  • Written By: Last Updated:

नाशिक : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनीच उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख केले. आदित्य ठाकरेंना युवा नेतृत्व म्हणून पुढे आणले. मग इतरांना आक्षेप कसला, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. ते चिंचवड पोटनिवडणुकीतील प्रचारसभेत बोलत होते. आमचा कारभार व्यवस्थित सुरू असतांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काही लोकांनी गद्दारी केली, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, अजित पवारांना आता वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सडेतोड उत्तर दिलं.

नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभ सोहळ्यानंतर महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘भारतीय जनता पक्षासोबत बाळासाहेबांची शिवसेना गटाचे सर्व 40 आमदारांसह इतर घटक पक्षही महायुतीच्या बाजूने असल्याने विरोधी पक्षनेत्यांनी 40 आमदारांबद्दल चिंता करू नये. त्यांना गद्दार बोलून ते निवडून येणार नाही. अडीच वर्षांपूर्वी अजितदादा तुम्ही आमच्या सोबत आले होते. त्यावेळी मी स्वतः तुमच्या सोबत राजभवनावर उपस्थित होतो. त्यामुळे तुम्हाला तरी गद्दारीवर बोलण्याचा अधिकार नाही, असा टोलाही महाजन यांनी लगावला.

गिरीश महाजन म्हणाले, ”राज्यात नुकत्याच झालेल्या शिक्षक व पदवीधर संघाच्या निवडणुकीत काही जागांवर आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी जनमत आमच्या बाजूने आहे. या पराभवाचे कारणांचा आम्ही नक्कीच शोध घेऊ. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह विधानसभेच्या निवडणुकीतही भाजप महायुतीला जनमताचा कौल मिळेल.

Parth pawar : ‘त्यांना स्वातंत्र्य आहे’, पार्थ पवारांवर सुनेत्रा पवार थेट बोलल्या…

तुरुंगात असताना मला एक ऑफर आली होती, ती स्वीकारली असती तर अडीच वर्षांपूर्वीच ठाकरे सरकार कोसळले असते, असे विधान माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी नागपुरात बोलताना केले होते. त्यावर प्रतिक्रिया देतांना महाजन म्हणाले, अनिल देशमुख यांना कुठलाही प्रस्ताव दिलेला नव्हता. उलट विधानसभा निवडणुकीपूर्वी मला भाजपमध्ये घ्या, अशी विनंती त्यांनी कितीवेळा केली होती, अशा शब्दात पलटवार केला आहे.

 

Tags

follow us