Download App

फक्त डिंग्या मारायच्या, पंतप्रधानांवर टीका करण्याची तुमची पात्रता आहे का? हे तपासा; महाजनांचं ठाकरेंवर टीकास्त्र

Girish Mahajan : परवा उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकलं. ते म्हणाले पंतप्रधान अमेरिकेत जाऊन बसले. मात्र ते काही तुमच्यासारखे फिरायाला गेले नाहीत. फोटोग्राफी करायला गेले नाहीत. पण ते पत्येक भारतीयांना अभिमान वाटावा की, त्यांचा अमेरिकेत बहुमान होतो. मात्र आमचे नतद्रष्ट माजी मुख्यमंत्री विचारतात कशासाठी गेले. करायच काहीच नाही. फक्त डिंग्या मारायच्या, पंतप्रधानांवर टीका करण्याची तुमची पात्रता तरी आहे का? हे जरा तपासून पाहा मग टीका टीपण्णी करा. अशी टीका भाजपचे नेते आणि मंत्री गिरिश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ते जळगावमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील या कार्यक्रमाला उपस्थिती होती. ( Girish Mahajan criticize Udhav Thackery on PM Modi America Tour )

भ्रष्टाचारावरुन राऊतांनी मोदींना दाखवला आरसा; म्हणाले, भाजपमध्ये…

काय म्हणाले गिरिश महाजन?
परवा उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकलं. ते म्हणाले पंतप्रधान अमेरिकेत जाऊन बसले. मात्र ते काही तुमच्यासारखे फिरायाला गेले नाहीत. फोटोग्राफी करायला गेले नाहीत. तसेच ज्या अमेरिकेच्या ज्या संयुक्त सभागृहात मोदी यांनी भाषण केलं आहे. त्या संयुक्त सभागृहामध्ये अमेरिकेच्या इतिहासात फक्त दोनच व्यक्ती इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान विस्टन चर्चिल आणि नेल्सन मंडेला तर आता तिसरे व्यक्ती हे मोदी ठरले आहेत. तेथे त्यांनी जेट विमानाच्या संदर्भात करार केला. गुगलशी करार केला. त्यामुळे आयटी क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. मात्र आमचे नतद्रष्ट माजी मुख्यमंत्री विचारतात कशासाठी गेले. तुम्ही कोरोनामध्ये लॅपटॉपवरून सगळं पाहत होते. मात्र वरून सांगतात लोकांचे जीव वाचवले. तुम्हाला काहीच वाटत नाही.

राष्ट्रवादीचे घोटाळे अन् सुप्रिया सुळेंचं भलं… : निवडणुकीपूर्वी PM मोदींचं शरद पवारांवर तोंडसुख

त्याचबरोबर पुढे महाजन असं देखील म्हणाले की, लोकांनी हे बघितलं आहे. आम्हीही हे पाहिलं आहे. करायच काहीच नाही. फक्त डिंग्या मारायच्या, पंतप्रधानांवर टीका करण्याची तुमची पात्रता तरी आहे का? हे जरा तपासून पाहा मग टीका टीपण्णी करा. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मोदींच्या पायााला हात लावून नमस्कार करतात. जग त्यांच्याकडे मोठ्या आशेने बघतयं. याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.

त्याचबरोबर आज देशात केंद्रात भाजप सरकार राज्यात भाजप सरकार असं डबल इंजिनच सरकर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. ते रात्रंदिवस फिरून काम करत आहेत पण आपण काहीच केलेलं नाही आणि आता मोठ्या डिंग्या मारायच्या मला वाटत हे अजबच आहे. अशी टीका भाजपचे नेते आणि मंत्री गिरिश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तसेच यावेळी महाजनांनी एकनाथ खडसेंवर देखील टीका केली आहे.

Tags

follow us