भ्रष्टाचारावरुन राऊतांनी मोदींना दाखवला आरसा; म्हणाले, भाजपमध्ये…

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 06 27T171532.586

Sanjay Raut On PM Modi :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. यावेळी ते  पत्रकारांना संबोधित करत होते. मोदींनी आज भोपाळ येथील भाषणात विरोधी पक्षावर जोरदार निशाणा साधला. त्यावर राऊतांनी जोरदार उत्तर दिले आहे. आमचा जर 20 लाख कोटींचा घोटाळा असेल तर जे भारतीय जनता पक्षाच्या फोटोखाली आहेत त्यांचा 50 लाख कोटींचा भ्रष्टाचार आहे, असे म्हणत राऊतांनी मोदींना आरसा दाखवला आहे.

राऊत पुढे म्हणाले की,  आम्ही भ्रष्टाचाराचा  हिशोब देतो. महाराष्ट्रामध्ये 1 लाख कोटींचा घोटाळा आहे. दादा भूसे, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, राधाकृष्ण विखे पाटील, राहुल कुल यांच्यावर पंतप्रधान कारवाई करणार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच संसदेमध्ये भ्रष्टाचाराच्या संदर्भात आम्ही प्रश्न उपस्थित केले तेव्हा तुम्ही पळून गेला. त्यामुळे संसदेचं काम चाललं नाही. राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांनी जे प्रश्न विचारले त्यावर तुम्ही उत्तर दिलेलं नाही. विरोधी पक्षावर टीका करणं सोपं आहे. याची उत्तरं 2024 साली मिळतील, असे म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला. याशिवाय मणिपूर पेटलय त्यावर मोदी बोलले नाही. महागाईवर ते बोलले नाही. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर मोदी बोलले नाही.

राष्ट्रवादीचे घोटाळे अन् सुप्रिया सुळेंचं भलं… : निवडणुकीपूर्वी PM मोदींचं शरद पवारांवर तोंडसुख

याआधी ठाकरे गटाचा मोर्चा 1 जुलै रोजी मुंबई महापालिकेवर निघणार होता. त्याला परवानगी नाकारण्यात आल्याने राऊतांनी राज्य सरकारला सुनावले आहे. आमचा अतिरेक्यांचा मोर्चा होता का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा मुंबईतल्या नागरिकांचा मोर्चा आहे. जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना तत्काळ राजीनामा दिला पाहिजे. कारण कायदा आणि सुव्यवस्था त्यांच्यामुळे कोसळल्याचे स्पष्ट आहे, असे ते म्हणाले.

Sabrina Siddiqui: पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणारी महिला पत्रकार ट्रोल, व्हाईट हाऊसकडून निषेध

तसेच मुंबईतील ठाकरे गटाची शाखा ही बेकायदेशीर असल्याचे सांगत पाडण्यात आली. त्यावर राऊतांनी भाष्य करत गेल्या चाळीस वर्षांपासून ही शाखा तिथे होती. तेव्हा नाही आठवले का असा प्रश्न केला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरुन ही शाखा पाडण्याचे आदेश देण्यात आल्याचे राऊतांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube