Dhananjay Munde : ‘राजकारण सोडून दे, अन्यथा…’ करूणा मुंडेंना धमकीचा फोन

बीड : धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करूणा मुंडे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. यावेळी त्यांना बालाजी डोईफोडे नावाच्या व्यक्तीने फोन केला. त्याने आपण धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले आहे. या व्यक्तीने करूणा मुंडे यांना शिवीगाळ केली. राजकारण सोडून दे, अन्यथा जाळून जिवे मारून टाकू, अशी धमकी त्याने दिली. शिवाय, धनंजय मुंडे […]

Untitled Design (57)

Untitled Design (57)

बीड : धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करूणा मुंडे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. यावेळी त्यांना बालाजी डोईफोडे नावाच्या व्यक्तीने फोन केला. त्याने आपण धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले आहे. या व्यक्तीने करूणा मुंडे यांना शिवीगाळ केली. राजकारण सोडून दे, अन्यथा जाळून जिवे मारून टाकू, अशी धमकी त्याने दिली. शिवाय, धनंजय मुंडे व राजश्री मुंडे यांनी आपल्याला तुला मारण्याची सुपारी दिली असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करूणा मुंडे यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. करूणा मुंडे या बीडमध्ये असताना त्यांना ही धमकी देण्यात आली आहे. करूणा या रविवारी बीड जिल्ह्यातील आष्टी दौऱ्यावर होत्या. हा दौरा आटोपून त्या बीडमध्ये परत येत असताना त्यांना हा धमकीचा फोन आला आहे.

त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करूणा मुंडे यांनी या जिवे मारण्याची धमकीसंदर्भात पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांच्याकडे धनंजय मुंडे यांनी तक्रार करण्याचा प्रयत्न केला मात्र ते कार्यालयात नसल्याने त्यांनी फोन करत ही तक्रार दाखल केली आहे.

यावेळी ही तक्रार करताना करूणा मुंडे म्हणाल्या की, आपल्या जिवाला धनंजय मुंडे, राजश्री मुंडे, तेजस ठक्कर, राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे आणि बालाजी डोईफोडे यांच्यापासून धोका आहे. तसेच त्यांनी यासर्वांवर गंभीर आरोप केले आहे.

Exit mobile version