Download App

‘जयंत पाटील नीच अन् कपटी माणूस, टप्प्यात आणून कार्यक्रम..’; भाजप नेत्याची जहरी टीका

जयंत पाटील हा नीच आणि कपटी माणूस आहे. ते टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात, पण जयंत पाटील (Jayant Patil) आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय,

  • Written By: Last Updated:

Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर जहरी टीका केली. जयंत पाटील हा नीच आणि कपटी माणूस आहे. ते टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात, पण जयंत पाटील (Jayant Patil) आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय, असं पडळकर म्हणाले.

Delhi Election Results : मोठी बातमी! दिल्लीत मुख्यमंत्री आतिशी विजयी तर सत्येंद्र जैन पराभूत 

कवठेमहांकाळमध्ये बहुजन समाजातर्फे आयोजित सत्कार सोहळ्यात पडळकर बोलत होते. पडळकर म्हणाले की, जयंत पाटील कपटी आणि नीच माणूस आहे, म्हणून ते कधी समाधानी नसतात. मी जत मतदारसंघातून निवडून येऊ नये यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. पण जतच्या लोकांना कळतंय कोणाला घरी घालवायचे. तुम्ही सांगायची गरज नाही. जयंत पाटील हे टप्प्यात आणून कार्यक्रम करतात, असं मला एक जण म्हणाला. पण जयंत पाटील आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय, असं पडळकर म्हणाले.

विधान परिषदेवेळी माझा अर्जबाद करा म्हणाले
पडळकर म्हणाले की, जयंत पाटील यांच्यावर मी बोलतोय म्हणता तुम्ही. पण ते मला किती विरोध करत असतात. जेव्हा मी विधान परिषदेचा आमदार झालो त्यावेळी मला विरोध केला. निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी मला विरोध करत आक्षेप घेतला. तुम्ही खोटी माहिती दिली आहे, अर्ज बाद करा, असं पाटील यांनी सांगितल्याचं पडळकर म्हणाले.

आपला मुलगा आमदार व्हावा, यासाठी इचलकरंची लोकसभा मतदारसंघात त्यांनी चाचपणी केल्याचं पडळकर म्हणाले.

जयंत पाटील भाजपच्या संपर्कात
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढील आठवड्यात सांगलीच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते राजारामबापू शिक्षण आणि उद्योग समूहाला भेट देणार आहे. त्यामुळं जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, आगामी काळात जयंत पाटील भाजपसोबत जातात की, राष्ट्रवादीतच राहतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us