मोठी बातमी! भाजपची दुसरी यादी जाहीर, गोपीचंद पडळकर रिंगणात
BJP Second List Announced : विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून (BJP) आपली दुसरी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये 22 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी कसबा विधानसभा मतदारसंघातून हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर खडकवासलामधून भीमराव तापकीर आणि पुणे कॅन्टोन्मेंटमधून सुनील कांबळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
तर धुळे ग्रामीणमधून राम भदाणे, मलकापूरमधून चैनसुख संचेती, अकोटमधून प्रकाश भारसाकले, अकोला पश्चिममधून विजय अग्रवाल, वाशीममधून श्याम खोडे, मेळघाटमधून केवलराम काले, गडचिरोलीमधून डॉ. मिलिंद नरोटे, राजुरामधून देवराव भोंगले आणि ब्रह्मपुरीमधून कृष्णलाल सहारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कृष्णलाल सहारे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे.
BJP releases the second list of 22 candidates for the #MaharashtraElection2024.
Elections in Maharashtra will be held on November 20, while the counting of votes will take place on November 23. pic.twitter.com/Vk9LgHaSom
— ANI (@ANI) October 26, 2024
तसेच पक्षाने वरोरामधून करण देवतळे, नाशिक मध्यमधून देवयाणी फरांदे, विक्रमगडमधून हरिश्चंद्र भोये, उल्हासनगरमधून कुमार आयलानी, पेणमधून रवींद्र पाटील, लातूर ग्रामीणमधून रमेश कराड, सोलापूर शहर मध्यमधून देवेंद्र कोठे, पंढरपूरमधून समाधान आवताडे, शिराळमधून सत्यजित देशमुख आणि जतमधून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मोठी बातमी! नगरमध्ये माजी महापौर अभिषेक कळमकर देणार संग्राम जगतापांना फाईट, उमेदवारी जाहीर
यापूर्वी भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती तर आता 22 जणांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापर्यंत 121 जणांना उमेदवारी जाहीर केली आहे.