सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन प्रमाणपत्र घेणार; पडळकरांसमोर बोऱ्हाडेंचा फडणवीसांवर निशाणा

बुधवारी धनगर समाजाने जालन्यामध्ये (Jalna)मोर्चा काढला होता. या मोर्चात बोऱ्हाडे यांनी थेट सरकारला इशारा देत आंदोलनाची पुढील दिशाही जाहीर केलीय.

  • Written By: Published:
Dhangar Morcha Jalana

Dhangar Community Protest Jalna: मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबीचे दाखले मिळविण्यासाठी मनोज जरांगेंनी उभारलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळालयं. त्यानंतर धनगर समाजाला (Dhangar Community)एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळविण्यासाठी मराठवाड्यात धनगर समाज आक्रमक झाले आहे. या मागणीसाठी दीपक बोऱ्हाडे (Deepak Borhade) शहरातील अंबड चौफुलीवर गेल्या सात दिवसांपासून उपोषण आंदोलन करत आहेत. बुधवारी धनगर समाजाने जालन्यामध्ये (Jalna)मोर्चा काढला होता. या मोर्चात बोऱ्हाडे यांनी थेट सरकारला इशारा देत आंदोलनाची पुढील दिशाही जाहीर केलीय.

Heavy Rain : नुकसानीचे पंचनामे सुरू, मदतीपासून कोणीही वंचित राहाणार नाही; मंत्री विखेंची ग्वाही


आमदारांच्या घरांसमोर होणार आंदोलन

29 सप्टेंबरला राज्यभरातील आमदारांच्या घरासमोर धनगर समाज आंदोलन करणार आहेत. तर एक ऑक्टोबरला राज्यभरात रास्ता रोको आंदोलन केले, तर 29 सप्टेंबरला भाजप आमदाराच्या घरासमोर ढोल, मेंढ्या घेऊन, कुऱ्हाड घेऊन आंदोलन केले जाईल, असे बोऱ्हाडे यांनी जाहीर केले आहे.


आता द्या आरक्षण कसं द्यायचं ते तुम्ही पहा…

आपल्या भाषणात बोऱ्हाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केलीय. बोऱ्हाडे म्हणाले, संविधानात धनगर समाज 36 नंबरवर आहे. देवाभाऊ तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देणार होते. आता द्या आरक्षण कसं द्यायचं ते तुम्ही पहा. नाहीतर संविधानामध्ये 36 नंबरला धनगर नाहीत असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावे. देवाभाऊंनी असे म्हणावे मी बारामतीमध्ये आलो तेव्हा धनगर समाजाला खोटे बोललो. मला माफ करा, असे जाहीर तरी करा. सरकार सहजासहजी प्रमाणपत्र देणार नाही. सरकारच्या मुंडक्यावर पाय दिल्यावर प्रमाणपत्र मिळेल, असा इशाराही बोऱ्हाडे यांनी दिलाय.


नियम न पाहता शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांसाठी केंद्रित मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आमदार गोपीचंद पडळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे हेही मोर्चात सहभागी झाले होते. परंतु व्यासपीठावर ते नव्हते. सर्वसामान्य मोर्चाकऱ्यांमध्ये ते बसले होते. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासमोर बोऱ्हाडे हे सरकार आणि देवेंद्र फडणवीसांवर टीका करत होते.

follow us