नियम न पाहता शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांसाठी केंद्रित मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्य सरकारच्या वतीने तातडीने मदत सुरू केली. आम्ही तातडीने 2 हजार कोटी रूपये रिलीज केलेत, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

CM Devendra Fadnavis Assistance for farmers : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा भागात भेट दिली. शेतीचं नुकसान आहेच, पण घरात पाणी गेल्यामुळे अन्नधान्याचं, घरातल्या सामानाचं देखील नुकसान झालं आहे. एनडीआरएफने चांगल्या प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन चालवलं आहे. राज्य सरकारच्या वतीने आम्ही तातडीने मदत सुरू केली आहे. कालही आम्ही तातडीने 2 हजार कोटी रूपये रिलीज केले आहेत, असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
नागरिक केंद्रीत मदत
शेतकऱ्यांना (Farmer) आम्ही मदत करणारच आहोत, पण त्याचसोबत (Heavy Rains) ज्यांच्या घरांचं नुकसान झालंय, अन्नधान्याचं नुकसान झालंय. अशांना देखील आम्ही मदत करणार आहोत. कुठलेही अधिकचे निकष न लावता, आवश्यकता असेल तिथे निकष शिथील करून नागरिक केंद्रीत मदत करायची आहे. केवळ नियमांवर बोट न ठेवता. नागरिकांना शेतकऱ्यांना मजुरांना मदत होईल, अशा प्रकारची मदत करण्याचे निर्देश आम्ही दिले आहेत, असंही यावेळी बोलताना फडणवीस ( CM Devendra Fadnavis) म्हणाले.
सगळ्या प्रकारच्या सवलती
आपत्ती सुरू असतानाच पैसे रिलीज केले आहेत, दिवाळीपूर्वीच सर्वांना मदत दिली जाणार आहे. ओला दुष्काळ ही बोलीभाषेतील टर्म आहे. परंतु टंचाईच्या काळात ज्या सवलती नागरिकांना दिल्या जातात, त्या सर्व देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. सगळ्या प्रकारच्या सवलती देऊ. तातडीची मदत पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यात देऊ, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्याला तातडीची मदत
काल मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे, जेव्हा पाऊस ढगफुटीने होतो, तेव्हा पूर येतो, असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटलंय. की, निसर्गाचं चक्र बदललं आहे. त्याचा परिणाम होत आहे. पहिल्यांदा शेतकऱ्याला तातडीची मदत देणं गरजेच आहे, असं सांगत मुख्यमंत्री यांनी कर्जमाफीवर बोलणं टाळलं आहे.