Gopichand Padalkar : साहेब,ताई अन् दादा, एसटीडीच्या गुलामगिरीतून बाहेर पडा; पडळकरांचा पुन्हा पवारांवर निशाणा

Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar ) यांनी सध्या धनगर आरक्षणासाठी ‘धनगर जागर’ यात्रा सुरू केली आहे. त्यांची ही यात्रा पुण्यातील इंदापूरमध्ये आली होती. त्यावेळी त्यांनी पवार कुटुंबावर जोरदार टीका केली. त्यांनी यावेळी विशेषतः सत्तेत सामील झालेले अजित पवार यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. काय म्हणाले गोपीचंद पडळकर? इंदापूरमध्ये या यात्रेदरम्यान […]

Ajit Pawar And Gopichand Padalkar

Ajit Pawar And Gopichand Padalkar

Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar ) यांनी सध्या धनगर आरक्षणासाठी ‘धनगर जागर’ यात्रा सुरू केली आहे. त्यांची ही यात्रा पुण्यातील इंदापूरमध्ये आली होती. त्यावेळी त्यांनी पवार कुटुंबावर जोरदार टीका केली. त्यांनी यावेळी विशेषतः सत्तेत सामील झालेले अजित पवार यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे.

काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

इंदापूरमध्ये या यात्रेदरम्यान पडळकर घोड्यावरस्वार झाले. तर त्यांना क्रेनने हार घालत त्यांचं वाजत गाजत स्वागत करण्यात आलं. यावेळी भाषणामध्ये त्यांनी पवार कुटुंबावर जोरदार टीका केली. त्यांनी यावेळी विशेषतः सत्तेत सामील झालेले अजित पवार यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला.

मराठा आरक्षण: अजित पवारांनी टोचले मनोज जरांगे पाटलांचे कान

यावेळी पडळकर म्हणाले की, धनगर समाजाने एसटीडीच्या गुलामगिरीतून बाहेर पडावं. समाज या एसटीडीच्या नादात किती दिवस गुरफटणार एस म्हणजे साहेब, टी म्हणजे ताई आणि डी म्हणजे दादा असा टोला त्यांनी लागावला. तर पुढे ते म्हणाले की, यातून बाहेर पडाल तर तुम्ही राजा व्हाल. साहेब, ताई आणि दादा म्हणायचं सोडून द्या.

धक्कादायक! बॉलिवूड अभिनेत्रीला चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी लाखो रुपये केले लंपास

इंग्रजांच्या काळात ज्याप्रमाणे अन्याय करण्यासाठी रचना होती. तशी ही एसटीडीची रचना आहे. आपले एकच साहेब आहेत ते म्हणजे डॉ. बाबासाहेब अंबेडकर आहेत. तसेच जेव्हा मी धनगर जागर यात्रा सुरू केली. तेव्हा लांडग्याची सगळी पिल्ल कामाला लागली. त्यांनी यावेळी नाव न घेता पवारांना लांडगा म्हटलं. तर जेव्हा राज्यात धनगर जागा होतो. तेव्हा प्रस्थापितांची झोप उडते असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

Exit mobile version