धक्कादायक! बॉलिवूड अभिनेत्रीला चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी लाखो रुपये केले लंपास

धक्कादायक! बॉलिवूड अभिनेत्रीला चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी लाखो रुपये केले लंपास

Nikita Rawal: अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘गरम मसाला’ या सिनेमातील (Bollywood Actress) अभिनेत्री निकिता रावलसोबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांच्याच घरातील नोकरांनी बंदुकीच्या धाकावर त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपये लुटल्याची माहिती समोर आली आहे. (Social media) अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार की, जेव्हा तिने त्या चोरांना रोखण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्यांनी हाणामारी सुरू केली. यामुळे अभिनेत्री खूप घाबरली होती. चोरट्यांनी निकिताला पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikita Rawal (@nikita_rawal)


या संपूर्ण घटनेबाबत निकिताने सांगितले आहे की, “मला मोठा धक्का बसला आहे. माझ्या घरातील एका कर्मचाऱ्याने हे केले आहे, यावर माझा देखील विश्वास बसत नाही. लोकांचा प्रथम विश्वास कसा कमावला जातो आणि नंतर त्याचा इतक्या प्रमाणात गैरवापर कसा होतो, हे धक्कादायक प्रकार मी अनुभवाला आहे. तसेच काही गुंडांनी माझ्याकडे बंदुकीचा धाक दाखवून माझ्या मानेवर चाकू ठेवला आणि त्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास तुमची मान कापून टाकू अशी धमकी अभिनेत्रीला देण्यात आल्याची माहिती तिने यावेळी सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री झोपीत असतानाअंगठी आणि इतर दागिने टेबलावर ठेवत असे. गेल्या काही दिवसांपासून तिचे काही सामान आणि 10-15 हजार रुपये चोरीला जात होते. त्यांनी एकूण 3 लाख 80 हजार रुपये चोरले आहेत. तसेच अभिनेत्रीला ते कायम धमक्या देत होते. ते पळून गेल्यावर तिने लगेच पोलिस स्टेशनला या घटनेबद्दल माहिती दिली आहे. आणि एफआयआर दाखल केला आहे. सध्या पोलिसांनी दोघांही आरोपीना पकडले आहे. दोघेही बांगूर नगर पोलिस ठाण्यात आहेत.

Kangana Ranaut: ‘इमर्जन्सी’ विषयी कंगनाची मोठी घोषणा; ट्वीट करत म्हणाली, ‘मी या चित्रपटासाठी…’

निकिताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अनिल कपूरसोबत ब्लॅक अँड व्हाईट, जॉनसोबत गरम मसाला या चित्रपटांशिवाय अनेक बॉलिवूड आणि टॉलीवूड सिनेमात तिने आपली कला दाखवली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube