Download App

कोश्यारींचा राजीनामा का, याचे फडणविसांनी दिले वेगळेच स्पष्टीकरण

  • Written By: Last Updated:

मुंबई : वादग्रस्त वक्तव्यांमुळे स्वत:ला आणि सरकारला सातत्याने अडचणीत आणणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्यं केल्यामुळे कोश्यारी अडचणीत आले होते. त्यामुळे विरोधकांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. यानंतर भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्याजागी रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून सूत्रे स्वीकारतील. त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. तर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल कोश्यारी (Governor Koshyari) यांनी मागाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे प्रकृतीच्या कारणामुळे राजीनामा दिला. त्यांना वादात टाकण्याचं काम केलं महाविकास आघाडीच्या वतीने केलं असल्याचं फडणवीस म्हणाले.

बोरिवली येथे आमदार सुनील राणे यांनी कुस्तीची दंगल आयोजित केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आज या कुस्तीची सुरुवात करण्यात आली. यावेळी फडणवीस यांना माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मावळते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला. त्यांनी त्याबाबत क्लेरिफिकेशन दिलेलं होतं. परंतु मविआ नेत्यांचा त्यांच्यावर राग होता. हा चॅप्टर संपला आहे. कोश्यारींनी महाराष्ट्राची सेवा केली, त्यांचे आभार मानतो, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी भावना व्यक्त केल्या.

Ajit Pawar : सरकारने रडीचा डाव थांबवला पाहिजे 

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत उत्तर भारतीयांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केली. आम्ही भाजपची साथ सोडली, हिंदूत्व नाही; भाजप म्हणजे हिंदूत्व नाही, अशा शब्दात त्यांना भाजपवर ताशेरे ओढले. हिंमत असेल तर निवडणुका घ्या असं आव्हाननही त्यांनी भाजपला केले. त्या टीकेला प्रत्युत्तर देतांना फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे असं काहीतरी बोलत असतात. संविधानांनानुसार एकत्र निवडणुका होत नाही. त्यांनी वन नेशन वन निवडणूक घेण्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र आणावं असं म्हणत, त्यासाठी त्यांना वन नेशन वन इलेक्शन या मोदींच्या मोहिमेला पाठिंबा द्यावा लागेल, असा खोचक टोलाही फडणवीसांनी लावला. दरम्यान, बीएमसीची कुस्ती कधी होणार, असे विचारले असता फडणवीस म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयानंतर होईल.

 

Tags

follow us