“अजित पवार हे आज काहीही म्हटले असलं तरीही राष्ट्रवादीतील आमदार बोलतायेत आम्ही अजित दादा सोबत आहोत. तर त्यावरून राष्ट्रवादीमध्ये ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे कधीही पाऊस पडण्याची शक्यता आहे.” अशी खोचक टीका मंत्री गुलबाराव पाटील यांनी राष्ट्रवादीवर केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा होती. त्यावर अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहे. तसेच माझ्याविषयी सारख्या अफवा पसरवल्या जात आहे. तर मी आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? असा संतप्त सवाल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केला आहे, असे पवार म्हणाले आहेत.
अजित पवार यांनी जाहीर स्पष्टीकरण दिल असलं तरीही त्यांच्या या वक्तव्यांवरून अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता अजित दादा आताफार काळ थांबतील असं वाटत नाही. ते काम करणारे नेते आहेत. त्यामुळे ते घाबरून निर्णय घेतील असं नाही. फक्त जुळवाजुळव करायला थोडा वेळ घेतील. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
आज अजित पवार यांच्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यावर भाष्य केलं होत. पक्ष एकत्र राहणार असून सगळे नेते पक्षसाठी काम करत आहेत. असं शरद पवार म्हणले होते. त्यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की शरद पवार बोलतात, त्याच्या उलट होत असत. त्यामुळे त्यांनी भविष्याची तयारी केली आहे. कोणीही माणूस आमचा पक्ष फुटणार असं म्हणत नाही.. असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.
भाजप प्रवेशावर काय म्हणाले अजितदादा? वाचा 10 मुद्द्यांमध्ये