Gunratna Sadavarte : महाराष्ट्राला पोलोचे खेळाडू, पाहुण्या कलाकारांची गरज नाही; सदावर्तेंची राज ठाकरेंविरोधात तक्रार

Gunratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी मुलुंड टोल नाका जाळल्या प्रकरणी देखील राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी यावेळी महाराष्ट्राला पोलोचे खेळाडू, पाहुण्या कलाकारांची गरज नाही. अशी टीका देखील केली. त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांची शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात […]

Maratha Reservation

Maratha Reservation

Gunratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी मुलुंड टोल नाका जाळल्या प्रकरणी देखील राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी यावेळी महाराष्ट्राला पोलोचे खेळाडू, पाहुण्या कलाकारांची गरज नाही. अशी टीका देखील केली. त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांची शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार टोल नाका जाळण्याची भाषा करणाऱ्या राज ठाकरेंना तातडीने अटक करा अशी लेखी तक्रार त्यांनी केली आहे.

राजस्थानमध्ये काँग्रेसला धक्का तर मध्य प्रदेशात भाजपला झटका, पाहा 5 राज्यांचे ओपिनियन पोल

मुलुंड टोल नाका जाळळा…

दरम्यान टोलच्या दरवाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Raj Thackeray) मैदानात उतरली असून ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव मागील चार दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. ठाण्यातील आनंदनगर टोलनाका (Toll Rate ) परिसरात त्यांनी उपोषण सुरू केले होते. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे येऊन भेट दिल्यानंतर जाधव यांनी उपोषण मागे घेतले.

महाराष्ट्राला पोलोचे खेळाडू, पाहुण्या कलाकारांची गरज नाही

तसेच यावेळी बोलताना सदावर्तेंनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली ते म्हणाले की, हिंदू राष्ट्र भारत हमारा असं मानणारं आमचं संघटन आहे. मराठी गुजराती तमिळ तेलुगु सगळ्यांसाठी महाराष्ट्र मुंबई एकत्र नांदण्यासाठी आहे, पोलोचे खेळाडू कधीतरी बाहेर येऊन बोलतात. छोट्याशा पक्षाचे नेते आहेत. आजोबाच्या वयाचे असतात तशी स्टोरी टेलिंग केली. अशा नालायक विचारांना सांगायचंय. असं घाणेरडे विचार करू नका, investment जातेय.

सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी हल्ला प्रकरण; आरोपींना अटक

तसेच पुढे ते असं ही म्हणाले की, कष्टकरी जनसंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंवर एफआयआर दाखल करावी याकरिता आम्ही अग्रगण्य आहोत. महाराष्ट्रात अशी हिंसा आणि राज ठाकरेंची दादागिरी चालवून घेणार नाही. डंके की चोट पे सांगत आहोत. काही झालं तर राज ठाकरेच जबाबदार आहे. तुम्ही पोलोचे खेळाडू असाल. पाहुणे कलाकारांसारखे येत असाल. महाराष्ट्राला पाहुण्या कलाकारांची गरज नाही.

Exit mobile version