Hasan Mushrif On Sharad Pawar : अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन राष्ट्रवादीत (NCP) बंड केलं आणि ते सत्ते़त सहभागी झाली. यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) आपला राज्यव्यापी दौरा सुरु केला. राष्ट्रवादीचा निष्ठावान कार्यकर्ता जागा करण्यासाठी ते ठिकठिकाणी सभा घेत आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर निष्ठावंतांची तिसरी सभा आता कोल्हापुरात सुरू आहे. या सभेत ते बंडखोरांचा जोरदार समाचार घेतील, असं बोलल्या जात आहे. दरम्यान, शरद पवारांचे कट्टर समर्थक राहिलेले हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला. मात्र, आज ते शरद पवारांविषयी बोलतांना भाऊक झालेले दिसले.
शरद पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्याविषयी मंत्री हसन मुश्रीफ यांना माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता मुश्रीफ म्हणाले, शरद पवार हे आज तब्बल 40 वर्षांनंतर पहिल्यांदाच कोल्हापुरात येणार आहेत. ते कोल्हापुरात येऊन देखील आमची भेट होणार नाही. परिस्थितीनुसार आम्ही सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय का घ्यावा लागला याचं स्पष्टीकरणंही आम्ही केलं आहे. आज पवार साहेब कोल्हापुरात येत आहेत. मात्र, मी आज त्यांच्यासोबत नसणार आहे, असं म्हणत ते भाऊक झाले.
अजित पवारांच्या बंडखोरीनंतर शरद पवार यांनी संपूर्ण राज्यात स्वाभिमानी यात्रा सुरू केली आहे. शरद पवार यांनी पहिली झंझावती सभा मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात घेतली. या सभेत त्यांनी अजित पवार गटावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर दुसरी सभा बीडमध्ये झाली. बीडमधील सभेची बरीच चर्चा झाली. कारण पवारांनी धनंजय मुंडेंना टक्कर देणारा उमेदवार पुढे आणलाय.
व्लादिमीर पुतिन यांना वाटते भारतात येण्याची भीती, G20 परिषदेला मारणार दांडी
यानंतर आज पवारांची तिसरी सभा कोल्हापुरात होत आहे. कोल्हापुरात शरद पवार काय बोलतात याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. कोल्हापूर सभेत संभाजीराजे छत्रपतींचे वडील शाहू महाराज व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभेसाठी पवार गटाचे उमेदवार शाहू महाराज असतील का? असा एक प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जातोय.
दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोप-
दरम्यान, या सभेआधीच दोन्ही गटांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. आज सकाळी सभेआधी आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदे घेत मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर मुश्रीफ यांनी रोहित पवारांवर टीकास्त्र डागलं. ते म्हणाले, रोहित पवार अजू्न लहान आहेत. पण, त्यांना अजित पवार यांची जागा घ्यायची आहे, असा आरोप त्यांनी केला.